सिंधुदुर्गात जागतिक आरोग्य दिन

By Admin | Updated: April 1, 2017 16:57 IST2017-04-01T16:57:28+5:302017-04-01T16:57:28+5:30

७ एप्रिल रोजी विविध कार्यक्रम

World Health Day in Sindhudurg | सिंधुदुर्गात जागतिक आरोग्य दिन

सिंधुदुर्गात जागतिक आरोग्य दिन

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी, दि. १ : सिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येणा-या जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जागतिक आरोग्य दिन दिनांक ७ एप्रिल २0१७ रोजी साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


परिचर्या प्रशिक्षण विद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता नैराश्य या विषयावर पोस्टर स्पर्धा, पॅनल डिस्कशन, रोल प्ले आदी कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. नैराश्यासंबंधी जनजागरण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्यातर्फेही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Web Title: World Health Day in Sindhudurg