शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत नाल्यात पडला, उठता न आल्याने पाण्यात गुदमरून कामगाराचा मृत्यू झाला; सिंधुदुर्गातील पोईप येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 15:59 IST

आधारकार्डवरील पत्त्यामुळे नातेवाइकांशी संपर्क करून त्यांना माहिती देण्यात आली

मालवण : पोईप येथील एका हॉटेलात आचारी म्हणून काम करणाऱ्या मनोज प्रल्हाद मोरे (३६) यांचा मृतदेह विरण- पोईप सीमेवरील नाल्यात शनिवारी सकाळी आढळून आला. याबाबत पोलिस पाटील निनाद माडये यांनी मसुरे पोलिस दूरक्षेत्राला माहिती दिली. मनोज मोरे हा तरुण दीड महिन्यापूर्वी पोईप येथील वर्दम यांच्या हॉटेलमध्ये कामाला आला होता. वर्दम यांच्या नातेवाइकांनी त्याला हॉटेलात कामाला ठेवले होते.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मनोज मोरे हा दारू पिऊन आल्याने हॉटेलमालक तुषार वर्दम यांनी त्याला 'कामावरून जा' असे सांगितले होते. तरी शनिवारी सकाळी लवकर उठून  त्याने हॉटेलातील काही पदार्थही  बनविले होते. त्यानंतर हॉटेलमालक वर्दम हे आपले हॉटेल घेऊन बिळवस यात्रेला गेले. मनोज मोरे विरण परिसरातील दुकानातून काही साहित्य खरेदी करून परत येत असताना पोईप विरण सीमेवरील नाल्यात तोल जाऊन पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. दहा फूट नाल्यावरून पडल्याने व दारूच्या नशेत असल्याने त्यांना पाणी कमी असूनही उठता आले नाही. परिणामी, पाण्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती प्राप्त झाली आहे.जिल्ह्यात त्यांचे कोणीही नातेवाईक नसल्याने त्यांच्याकडील आधारकार्डवरील पत्त्यामुळे त्यांच्या मुंबई येथील नातेवाइकांशी संपर्क करून त्यांना माहिती देण्यात आली. ही घटना समजताच मालवणचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, हवालदार राजन पाटील, सुहास पांचाळ, प्रमोद नाईक, शिपाई सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली; परंतु मोरे यांचे नातेवाईक उपस्थित नसल्याने पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करून मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.यावेळी पोलिस पाटील महेश परब, निनाद माडये, पंकज वर्दम, दिलीप कांदळकर, सिद्धेश माडये, रवींद्र कुशे, गोपीनाथ पालव, विजय पालव यांनी पोलिसांना सहकार्य केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeathमृत्यू