शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कणकवलीतील चौपदरीकरणाचे काम सर्व सम्मतीनेच : नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 12:11 IST

प्रकल्पग्रस्तांच्या मुद्यावर यशस्वी तोडगा निघाल्याने कणकवलीतील काम सर्व प्रकल्पग्रस्तांच्या सम्मतीनेच सुरू करण्यात येत असल्याची भूमिका आमदार नितेश राणे यांनी येथे जाहीर केली.

ठळक मुद्देकणकवलीतील चौपदरीकरणाचे काम सर्व सम्मतीनेच : नितेश राणेकणकवली प्रकल्पग्रस्तांच्या मुद्यांवर यशस्वी तोडगा भाजी, विक्रेते, स्टॉल धारकांचे होणार पुर्नवसन

कणकवली : कणकवलीतील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी लढा सुरू होता़. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कणकवलीतील प्रकल्पग्रस्तांना विशेष पॅकेज स्वरूपात मदत द्यावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार आ़मदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ़. दिलीप पांढरपट्टे यांच्या दालनात यशस्वी बैठक झाली आहे.

येत्या दोन दिवसात महत्वपूर्ण बैठक होऊन प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला व भाडेकरूंना मोबदला देण्यात येईल.निवाडा धारकांच्या खात्यावर मोबदला जमा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती अ‍ॅड़ उमेश सावंत यांनी दिली़. तर प्रकल्पग्रस्तांच्या मुद्यावर यशस्वी तोडगा निघाल्याने कणकवलीतील काम सर्व प्रकल्पग्रस्तांच्या सम्मतीनेच सुरू करण्यात येत असल्याची भूमिका आमदार नितेश राणे यांनी येथे जाहीर केली.कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आ़मदार नितेश राणे यांच्या उपस्थिती प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली़ . यावेळी अ‍ॅड़ उमेश सावंत, प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष उदय वरवडेकर, अनिल शेटये, बाळा बांदेकर, सुशिल पारकर, माधव शिरसाट व प्रकल्पग्रस्त, स्टॉल धारक, भाजी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी दालनात झालेल्या अंतीम चर्चेबाबत आ़मदार नितेश राणे यांनी माहिती दिली़. त्यामध्ये हॉटेल सह्याद्री ते मुख्यचौकापर्यंत दिवाळी असल्याने कोणतीही कारवाई होणार नाही. भाडेकरूंनी आपले बॅलन्सशिट व मालकाचे सम्मतीपत्र सादर केल्यानंतर त्याना मोबदला देण्यात येईल. कणकवलीला विकसीत करताना कोणाच्या पोटावर पाय येणार नाहीत, याची काळजी प्रशासन घेत आहे. जे दावे दाखल झाले आहेत ते दावे येत्या आठ दिवसात निकाली काढण्यात येतील. त्यामुळे सर्वांच्याच सम्मतीने कणकवलीत महामार्गाचे काम करण्यासाठी परवानगी असल्याचे आ़मदार नितेश राणे यांनी या बैठकीत स्पष्ठ केले.या बैठकीत भाजी विक्रेते, फळ विक्रेते व स्टॉल धारक यांच्यावतीने सुदीप कांबळे यांनी पुर्नवसन करण्याबाबत मागणी केली. तसेच २०१३ च्या कायद्यानुसार ज्या व्यक्तींचा उदरनिर्वाह बुडणार आहे. त्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून भरपाई मिळावी, अशी भूमिका मांडली. तर त्या मुद्यावर अ‍ॅड. उमेश सावंत यांनी हे महामार्ग भूसंपादन सक्तीच्या पध्दतीने होत आहे़. त्यामुळे जे बेकायदेशीर व्यवसाय करत असतील त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही़.भाजी विक्रेते, स्टॉल धारकांचे होणार पुर्नवसन !कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून महामार्गावर आपली उपजिवीका चालवत असलेल्या स्टॉल धारक, भाजी विक्रेते, फळ विक्रेते अन्य छोट्या व्यापाऱ्यांचे पुर्नवसन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आपण सर्व एकाच कुटुंबातील आहोत. त्यामुळे कोणाच्याही पोटावर लाथ बसणार नाही. हे काम विकासासाठी करणे आवश्यक आहे.त्यादृष्टीने नगरपंचायतमध्ये लवकरच बैठक आयोजित करून जागा देण्यात येईल, असे आश्वासन आ़मदार नितेश राणे यांनी दिले.आश्वासने न पाळल्यास काम अडवू !कणकवलीत प्रकल्पग्रस्त, विविध पक्षाचे नेते आणि आम्ही सर्वांनी एकत्रीत प्रयत्न केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे समाधान झाले आहे. अनेकदा काम अडवून प्रशासनाला आमच्या मागण्या मान्य करायला आम्ही भाग पाडले आहे़. दिलेल्या आश्वासनांवर ठोस कार्यवाही करण्याचा शब्द जिल्हाधिकारी डॉ़ . दिलीप पांढरपट्टे यांनी मंगळवारी बैठकीत दिला आहे़. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जर प्रशासनाने शब्द पाळला नाही तर पुन्हा काम अडवू असा इशारा आ़मदार नितेश राणे यांनी दिला.प्रकल्पग्रस्त राणेंचे ऋणी !प्रकल्पग्रस्तांची भूमिका घेऊन आ़मदार नितेश राणे आमच्या सोबत लढा देत होते़. खा़सदार नारायण राणे व विविध पक्षाचे नेते यांनी देखील या आमच्या लढ्यात अथक परिश्रम घेतले. इतर पक्षाच्या नेत्यानिहि प्रयत्न केले. त्यामुळेच कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचल्या. त्यामुळे या सर्वांचे आभार व्यक्त करून विस्थापितांचे पुर्नवसन करून द्यावे, अशी भावना उदय वरवडेकर यांनी या बैठकीत व्यक्त केली. 

टॅग्स :highwayमहामार्गNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्गChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील