शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

महिलेचा ‘लाख’मोलाचा प्रामाणिकपणा

By admin | Updated: June 14, 2016 00:13 IST

सर्वत्र होतेय कौतुक : रेल्वे प्रवासात सापडलेल्या पर्समधील ३० तोळ्यांचे दागिने केले परत

मालवण : अलीकडील काळात चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याने प्रामाणिकपणा लोप पावत चालला आहे. असे असले तरी प्रामाणिकपणा काही व्यक्तींनी अंगी कायमस्वरूपी बाळगला आहे. अशाच एका प्रामाणिकपणाचे दर्शन घडवलेय बदलापूर (नवी मुंबई) येथील अंजली अच्युत गावकर या महिलेने. मूळ देवगड येथील असणाऱ्या गावकर यांनी कुडाळ ते पनवेल रेल्वे प्रवासादरम्यान सापडलेले तब्बल तीस तोळ्याचे किंमती दागिने मूळ मालकाला परत केले आहेत. गावकर यांनी पर्समधील कागदपत्राच्या मदतीने मूळ मालकाचा मोबाईल नंबर मिळवत ‘लाख’मोलाचा ज्वेलरी बॉक्स सुपूर्द केला. कुडाळ तालुक्यातील पावशी येथील योगिता विकास घारे यांना त्यांचे हरवलेले दागिने परत मिळाल्याचे समाधान मिळाले आहे, तर दुसरीकडे गावकर यांनी माणुसकीचे दर्शन घडवीत केलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पनवेल येथील योगिता घारे या कुडाळ-पावशी येथे लग्न समारंभासाठी आल्या होत्या. लग्नकार्य आटोपल्यानंतर त्या कुडाळ येथून जनशताब्दी एक्स्प्रेसने मुंबईकडे जाण्यास रवाना झाल्या. त्यांच्या डब्यात कणकवलीहून मुंबईकडे जाण्यासाठी देवगड येथील अंजली गावकर या होत्या. घारे कुटुंबीय पनवेलला उतरले. त्यावेळी त्यांची पर्स रेल्वेतच राहिली होती.गावकर या ठाणे येथे उतरताना घारे यांची पर्स त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ती पर्स ताब्यात घेत बदलापूर येथे घरी गेल्या. त्यांनी पर्स पाहिली असता त्यात एका ज्वेलरी बॉक्समध्ये सोन्याचे तीन हार, दोन बांगड्या, दोन मंगळसूत्र, दोन अंगठ्या असा सुमारे २५ ते ३० तोळे वजनाचा लाखो रुपये किमतीचे दागिने पाहिले. त्यांनतर गावकर यांनी पर्समधील कागदपत्रांचा आधार घेत घारे यांच्याशी संपर्क साधून खातरजमा केली. त्यानंतर घारे कुटुंबीयांनी बदलापूर येथे गावकर यांच्या घरी जाऊन दागिने ताब्यात घेतले व गावकर यांचे आभार मानले. अंजली गावकर या मुंबई महानगरपालिकेत नोकरीला आहेत. जिल्ह्यातील कर्तबगार महिलेच्या ‘लाख’मोलाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक मालवणचे शिवसेना कार्यकर्ते दीपक मयेकर यांनीही केले आहे.(प्रतिनिधी)अन् जीव भांड्यात पडलादरम्यान, योगिता घारे घरी गेल्यानंतर ज्वेलरी बॉक्स रेल्वेतच विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ दादर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी सहकार्य करण्याऐवजी पनवेल पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची सूचना केली. रात्रीची वेळ असल्याने तक्रार नोंदविण्यासाठी सकाळी जाण्याचा निर्णय घारे यांनी घेतला. त्यादिवशी सकाळी गावकर यांनी त्यांना मोबाईलवरून संपर्क साधत पर्स मिळाल्याची माहिती देताच घारे कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. घारे यांनी गावकर यांच्या घरी जाऊन दागिने ताब्यात घेतले.