Sawantwadi: रेड्याच्या हल्यात महिला गंभीर जखमी
By अनंत खं.जाधव | Updated: November 27, 2023 15:48 IST2023-11-27T15:43:24+5:302023-11-27T15:48:33+5:30
सावंतवाडी : आंबोलीच्या पायथ्याशी असलेल्या पारपोली गावठाण येथील रश्मी रामकृष्ण गावकर (वय-45) यांच्यावर रेड्याने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी ...

Sawantwadi: रेड्याच्या हल्यात महिला गंभीर जखमी
सावंतवाडी : आंबोलीच्या पायथ्याशी असलेल्या पारपोली गावठाण येथील रश्मी रामकृष्ण गावकर (वय-45) यांच्यावर रेड्याने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. हल्ल्यात गावकर यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी सकाळी पारपोली गावठाण वाडी येथील गावकर याच्या घरापासून काही अंतरावर घडली.
रश्मी गावकर या नेहमी प्रमाणे गुरांना चरण्यासाठी सकाळी शेतात घेऊन जात असतानाच रेडा चांगलाच आक्रमक झाला. यावेळी रेड्याने गावकर याच्यावर हल्ला केला. यात त्यां गंभीर जखमी झाल्या. जखमी अवस्थेत त्यांना कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले मात्र पुढील उपचारासाठी त्यांना गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.