गव्याच्या हल्यात महिला गंभीर जखमी, आंबोली जवळील चौकुळ येथील घटना
By अनंत खं.जाधव | Updated: March 2, 2023 15:52 IST2023-03-02T15:51:33+5:302023-03-02T15:52:46+5:30
जखमी महिलेस सावंतवाडी कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले.

संग्रहीत छाया
सावंतवाडी : गव्याच्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली. सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ-कुंभवडे येथील भारती गावडे (वय-४०) असे या जखमी महिलेचे नाव आहे. आंबोली जवळील चौकुळ येथे ही घटना घडली.
हल्ल्यात गावडे यांच्या छातीला, पायाला, आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. गव्याचा हल्ल्यात त्या जागेवर बेशुद्ध पडल्या. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले.