शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
5
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
6
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
7
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
8
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
9
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
10
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
11
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
12
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
13
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
14
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
15
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
16
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
18
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
19
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
20
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांच्या गर्दीने सिंधुदुर्गातील किनारे गजबजले; नाताळ सण, सलग सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी किनारपट्टीला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 14:40 IST

जलक्रीडा प्रकारांना मागणी

संदीप बोडवेमालवण : नाताळच्या सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सिंधुदुर्गातील किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. विशेषतः मालवण, देवगड आणि वेंगुर्ला तालुक्यांतील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. पर्यटक सागरी पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.मालवणमधील तारकर्ली, देवबाग, दांडी, चिवला, वायरी, आचरा, तोंडवळी या किनाऱ्यांबरोबरच वेंगुर्ला येथील वेळागर-शिरोडा आणि देवगड येथील मिठमुंबरी, कुणकेश्वर हे किनारे पर्यटकांनी फुलले आहेत. मालवण येथील किनाऱ्यांवर असलेले त्सुनामी आयलँड, सिंधुदुर्ग किल्ला, निवती रॉक्स बेटे, जय गणेश मंदिर, राजकोट किल्ला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण राहिले आहेत.निवास व्यवस्था २८ डिसेंबरपर्यंत फुल्ल झाल्या असून, स्वच्छतागृहे, पाणी आणि पार्किंग अपुऱ्या पडत आहेत. पर्यटन व्यावसायिकांनी मूलभूत सुविधा वाढवण्याची मागणी केली आहे. पर्यटनवाढीचे कारण नाताळ सुटी आणि नववर्ष सणांच्या जोरदार सेलिब्रेशनमुळे देश-विदेशांतील पर्यटक कोकणाकडे वळले आहेत. दिवाळी हंगामातील पावसाचा फटका बसल्यानंतर हा हंगाम गजबजला आहे..

जलक्रीडा प्रकारांना मागणीजलक्रीडा प्रकारांप्रमाणे स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, बनाना राइड, बंपर राईड, बोटिंग सफारी, आणि स्नॉर्कलिंगला पर्यटकांच्या उड्या पडत आहेत. तारकर्ली खाडीत बॅकवॉटर बोटिंग करणे एक वेगळाच अनुभव आहे. डॉल्फिन सफारीसाठी मोठी मागणी आहे.

माशांचे दर वाढलेमालवणी खाद्यसंस्कृती सर्वत्र प्रसिद्ध आहे. खासकरून मालवणी जेवण. पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे माशांचे रेट वाढले आहेत. सुरमई, पापलेट, प्राँन्स, या माशांना मोठी मागणी आहे. या पदार्थांचाही पर्यटक आनंद घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sindhudurg Beaches Buzzing with Tourists for Christmas and New Year

Web Summary : Sindhudurg's beaches are crowded with tourists celebrating Christmas and New Year. Malvan, Devgad, and Vengurla are especially popular. Water sports and Malvani cuisine are big draws, though fish prices have increased due to high demand. Accommodation is fully booked.