शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

तिलारी वंचित प्रकल्पग्रस्तांचे दुखणे शासनाला जाणवेल?, न्याय हक्कासाठी प्राणांतिक उपोषण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 16:43 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी ना शेती, ना काम धंदा. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले

संदेश देसाईदोडामार्ग : तिलारी प्रकल्प पूर्ण होऊन वीस वर्षे लोटली तरी प्रकल्पग्रस्त अद्यापही न्याय हक्कासाठी आंदोलने-उपोषण छेडीत आहेत. प्रकल्पासाठी वडिलोपार्जित जमीन जुमल्याचा त्याग करून बिकट परिस्थितीशी झुंज देत असलेल्या शेतकऱ्याचे दुखणे शासन जाणून घेण्याच्या मानसिकते पलीकडे आहे. नोकरी तर नाहीच पण, वनटाईम सॅटेलमेंटच्या लाभापासून आद्यपही वंचित राहिलेला प्रकल्पग्रस्त दाही दिशा रडतो आहे. ही विवंचना सोडविण्यास शासन सकारात्मकता दर्शवेल काय? असा प्रश्न प्रकल्पग्रस्ताना भेडसावतो आहे.महाराष्ट्र-गोवा या दोन राज्यांच्या संयुक्तविद्यमाने तिलारी येथे धरण प्रकल्प उभारला. बुडीत क्षेत्रात गेलेल्या आठ गावांचे अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. फक्त घर बांधण्यापूर्ती जमीन शासना कडून देण्यात आली. तर, बुडीत क्षेत्रात गेलेल्या जमिनीची अल्प दारात किंमत करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम शासनाने केले आहे. पुनर्वसन केलेल्या ठिकाणी सोयी सुविधांची वानवा आद्यपही घर करून आहे.पोटाची खळगी भरण्यासाठी ना शेती, ना काम धंदा. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले. परिणामी हतबल झालेल्या प्रकल्पग्रस्ताला मोल मजुरीची कास धरावी लागली. खरतर प्रत्येक प्रकल्पग्रस्त कुटुंबातील व्यक्तीला शासनाने शासकीय सेवेत रुजूकरून घ्यायला हवे होते. त्यासाठी प्रकल्पग्रस्तानी काही वर्षांपूर्वी लढा देखील उभारला होता. अनेक आंदोलने उपोषणे झाली. त्यावेळी पदे रिक्त नसल्याचे कारण दाखवून शासनाने प्रकल्पग्रस्तांची गळचेपी केली. नोकरी धंद्यासाठी कासावीस झालेली प्रकल्पबाधित जनता शासनाच्या तटस्थ भूमिकेमुळे निराशेच्या घाईत लोटली गेली.अखेर चतुरबुद्धीच्या शासकीय अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तानचा विषय कायमचा संपुष्टात काढण्यासाठी 'वन टाईम सेटलमेंट' चे ब्रम्हास्त्रचा वापर केला. प्रकल्पग्रस्त दाखला धारकला नोकरी ऐवजी एक रक्कम देण्याचे धोरण अवलंबविले. आणि, या प्रलोभनिय धोरणाला जनता बळी पडली. एका दाखल्या मागे पाच लाख रुपये देण्याचे निर्देश काढले. शासनाने अधिकाधिक लोकांनाच्या खात्यात रक्कम जमा केली. ती सुद्धा टीडीएस कट करून. मात्र त्यापैकी अजूनही काही प्रकल्पग्रस्त या लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यांच्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.

शासनाला जाणीव करून देण्यासाठी केंद्रे येथील ग्रामस्थ मागील काही वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. परंतु, झोपेचं सोंग घेतलेल्या शासनाने त्यांच्या आर्त विनवणीकडे डोकावूनही पाहिले नाही. परिणामी वंचित प्रकल्पग्रस्ताला आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागला. गेल्या चार दिवसांपासून केंद्रेतील ग्रामस्थानी न्याय हक्कासाठी उपोषण छेडले आहे. मात्र, या उपोषणाकडे अधिकाऱ्यानी दुर्लक्ष केले. परंतु मागणीवर ठाम राहिलेल्या केंद्रे ग्रामस्थानी मागे न हटण्याचा निर्धारच केला आहे.

प्राणांतिक उपोषणएकरकमी अनुदानापासून वंचित राहिलेल्या  केंद्रेतील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थानी उपोषण छेडले आहे. पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यानी उपोषणाला भेट दिली. दिलेल्या आस्वासनाची पूर्तता केली नसल्याने उपोषण कर्त्यांनी उपोषणाचे स्वरूप बदलले. गुरुवार पासून प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे.शासनाचा निष्काळजीपणा जीवावर बेतणारान्याय हक्कासाठी प्राणांतिक उपोषण पुकारलेल्या पैकी कृष्णा हरिजन यांची तब्येत खालावली. त्यांना तात्काळ पाळये उपकेंद्रात दाखल केले. मात्र, चिंताजनक प्रकृती असल्याने त्यांना गोवा बांबुळी येथे दाखक करण्यात आले होते. प्रकल्पग्रस्तांच्या जिवावर बेतण्या पर्यंत प्रकरण आले तरीही शासन दखल घेत नाही. शासन निष्काळजीपणा जनतेच्या जिवावर बेतणारा आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTilari damतिलारि धरण