शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण टीका करणाऱ्यांना सोडणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विरोधकांना सज्जड दम

By सुधीर राणे | Updated: November 26, 2022 18:29 IST

शिवसेना आता मातोश्री पुरतीच मर्यादीत राहिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कुठेही दौरे केले तरी शिवसेना पक्ष वाढणार नाही

कणकवली: रिफायनरी प्रकल्प, सीवर्ल्ड किंवा कोकणात येणाऱ्या सर्व उद्योगांना शिवसेनेकडून सातत्याने विरोध केला जातो. मात्र, त्यानंतर प्रकल्प सुरू करण्यासाठी तोडपाणी केली जाते. एन्रॉनबाबतही शिवसेनेने तोडपाणी केली होती. असा आरोप करतानाच आम्ही जनतेची विकास कामे करतो. उगाचच टीका कोणावर करीत नाही.त्यामुळे यापुढे महाराष्ट्र ते दिल्ली पर्यंतच्या भाजप नेत्यांवर कोणी विनाकारण टीका करेल तर त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेर जाऊ देणार नाही. असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.जानवली येथील हॉटेल नीलम्स कंट्रीसाईड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, आमदार नीतेश राणे , जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे आदी उपस्थित होते.शिवसेना मातोश्री पुरतीचयावेळी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचाही समाचार घेतला. शिवसेना आता मातोश्री पुरतीच मर्यादीत राहिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कुठेही दौरे केले तरी शिवसेना पक्ष वाढणार नाही. महाराष्ट्र बंद करेन, बाकी काय बोलणार? उद्धव ठाकरे यांच्या जवळ कोण आहे ? त्यांचे 'पिल्लू' टीका करीत असून दिशा सालीयन प्रकरणातून तो सुटणार नाही. जनतेला विकास पाहिजे असेल तर टोल द्यावा लागेल. त्याशिवाय विकासकामांना निधी कसा मिळणार? सी वर्ल्ड प्रकल्प आम्ही आणणार आहोत. विनायक राऊत यांनी त्याला विरोध केला. मात्र आता सत्ता आमची असून आम्ही तो प्रकल्प आणू.भारत जोडो यात्रेच्या वेळी भाजपवर टीका केली गेली. त्याचे उत्तर आम्ही देणार आहोत. देशात, राज्यात बरीच वर्षे काँगेसची सत्ता होती. त्यांनी काय केले? टाळबा, महंम्मदवाडी, तिलारी प्रकल्प लवकरच पूर्ण होतील. काही तांत्रिक बाबी तसेच जमिनीचा प्रश्न आहे. तो सोडविला जाईल. धरण आणि केटी बंधारे यातील फरक वैभव नाईक यांना माहीत नाही. त्यामुळे ते मोठे धरण नको असे म्हणतात. वि.स.खांडेकर यांची जमीन त्यांच्या वारसांना निश्चित मिळवून देऊ. मात्र, त्यांच्यापैकी कोणी तरी नेमकी काय समस्या आहे, ते आमच्यासमोर मांडले पाहिजे. रोजगार देणारा प्रकल्प होत असेल तर आमचा त्याला  पाठींबाच असेल.सीमाप्रश्नासाठी राष्ट्रवादीने काय केले?महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासाठी अजित पवार यांनी काय कार्य केले आहे? त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी या प्रश्नाबाबत काय केले? ते आधी सांगावे. त्यामुळे त्यांना या विषयाबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार  नाही. राज्यातील शिंदे व फडणवीस सरकार येथील एक इंचही जमीन कोणाला  देणार नाही. या प्रश्नासाठी पहिले आंदोलन झाले. त्यात मी सहभागी झालो होतो. राज्याच्या जनतेला सुख समाधान मिळावे, यासाठी देवीच्या चरणी मागणे मागण्यासाठी शिंदे गटातील आमदार गुवाहाटीला गेले आहेत.तर त्यात काय वाईट आहे? असेही राणे म्हणाले.ग्रामपंचायत निवडणुकीतील युतीचा निर्णय पक्ष पातळीवर होणारआगामी ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटासोबत भाजपाने युती करण्याबाबतचा निर्णय पक्ष पातळीवर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठ वर्षात जे काम केले ते लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येणाऱ्या निवडणुकीत भाजपने राज्यात २०० जागा जिंकाव्यात असा संकल्प केला आहे. त्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.अंधारे ताईला भरपूर प्रसिद्धी मिळालीयापूर्वी सिंधुदुर्गात चाकरमानी फेब्रुवारी महिन्यात येत नसायचे, कारण पाण्याची मोठी समस्या असायची. कोणामुळे येथील रस्ते झाले? शिक्षणविषयक सुविधा, टँकर मुक्त जिल्हा कोणामुळे झाला? हे जाणून घ्या. मात्र, त्याचे कौतुक कोणी करीत नाही. याउलट जिल्ह्यात येऊन आमच्यावर विनाकारण टीका करणाऱ्या त्या ताईला भरपूर प्रसिद्धी मिळाली असा टोला प्रा.सुषमा अंधारे यांचे नाव न घेता नारायण राणे यांनी लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSushma Andhareसुषमा अंधारे