शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

मच्छिमारांना जास्तीत जास्त मदत देणार : महादेव जानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 11:12 AM

देवगड येथील मच्छिमारांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल, असे आश्वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी तांबळडेग व कुणकेश्वर येथे मच्छिमारांना दिले.

ठळक मुद्देमच्छिमारांना जास्तीत जास्त मदत देणार :महादेव जानकरदेवगड तालुक्यातील तांबळडेग, कुणकेश्वर परिसराची पाहणी

देवगड : येथील मच्छिमारांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल, असे आश्वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी तांबळडेग व कुणकेश्वर येथे मच्छिमारांना दिले.क्यार वादळ आणि अतिवृष्टीने झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी करून शासनाला अहवाल सादर करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्री जानकर यांनी देवगड तालुक्यातील मिठबांव, तांबळडेग, कुणकेश्वर येथे मच्छिमारांची भेट घेऊन नुकसानीचा आढावा घेतला.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर, देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, बाळा खडपे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त, सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी मुरारी भालेकर, तहसीलदार मारुती कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, पशुवैद्यकीय अधिकारी व्ही. एस. ढेकणे, गणपत गावकर, मिलिंद माने आदी उपस्थित होते.तांबळडेग येथे मच्छिमारांनी समुद्राचे नस्त धोकादायक बनले असून किनारपट्टी भागाची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. स्मशानभूमीचे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढावा व संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी मंत्री जानकर यांच्याकडे केली.मिठबांव गजबादेवी मंदिराकडील होड्या काढण्यासाठी बांधलेल्या जेटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नव्याने जेटी बांधण्यात यावी अशी मागणी मच्छिमारांनी केली.कुणकेश्वर येथे रापण व्यावसायिकांनीही जानकर यांच्याकडे क्यार चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे निवेदन दिले.शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मच्छिमारांनी यावेळी केली. यावेळी विश्वास भुजबळ तसेच कुणकेश्वर, कातवण येथील मच्छिमार उपस्थित होते. 

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरsindhudurgसिंधुदुर्ग