सावंतवाडी - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची कार अज्ञाताने जाळली होती, या पार्श्वभुमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज रात्री उशिरा परब यांची त्याच्या राहत्या घरी भेट घेऊन घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. कार जळीत प्रकरणानंतर स्वाभिमानच्या नेत्यानी मंत्री केसरकर याच्यावरच आरोप करत धुतराष्ट्राची उपमा दिली होती.त्यामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे.तसेच मंत्री केसरकर याचे परब हे आगामी विधानसभा निवडणुकीतले प्रतिस्पर्धो उमेदवार मानले जात आहेत.
कार जाळणारे शोधून काढणार! गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे संजू परब यांना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 23:24 IST