शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना भरपाई देणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 19:31 IST

kankavli, abdul sattar, minister, sindhdurgnews शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी १० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यानी जाहीर केला आहे.यातील उर्वरित निधीचे वाटप काही दिवसात केले जाईल. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत

ठळक मुद्देनुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना भरपाई देणार ! अब्दुल सत्तार यांचे कणकवलीत आश्वासन

कणकवली : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी १० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यानी जाहीर केला आहे.यातील उर्वरित निधीचे वाटप काही दिवसात केले जाईल. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत .गौण खनिज उत्खनन सुरू करण्याच्याबाबतीतही निर्णय झाला असून शासकीय इमारत बांधकाम, मच्छीमारासाठी विशेष अशा सोई सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना भरपाई देणार असल्याचे आश्वासन महसूल,ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.कणकवली येथे शनिवारी सायंकाळी मंत्री अब्दुल सत्तार यांचे आगमन झाले.यावेळी विजय भवन येथे खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते संदेश पारकर , जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत तसेच जिल्हाप्रमुख संजय पडते आदी नेत्यांसह शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. ' शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो ' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.मंत्री अब्दुल सत्तार हे शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.या दौऱ्यात विविध नियोजित कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.तसेच अधिकाऱ्यांसमवेत विकासकामांचा आढावा घेणार आहेत.कणकवलीत ते दाखल झाल्यानंतर कणकवलीत विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत पक्षवाढी सोबतच शिवसेना बळकटीसाठी तसेच जिल्हयातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यकर्त्याच्या तसेच नागरिकांच्या प्रश्नाबाबत निवेदन स्वीकारत पाठ पुराव्याचे आश्वासन दिले.यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले,प्रथमेश सावंत, नागेंद्र परब, देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर, नगरसेवक कन्हैया पारकर, सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव,वैदेही गुडेकर,मिलन तळगावकर,माधुरी दळवी सचिन सावंत,अँड हर्षद गावडे,संदेश पटेल,राजू राठोड,सतीश नाईक,भास्कर राणे, सचिन सावंत,रामू विखाळे, सुनील पारकर,ललित घाडीगावकर,सिद्धेश राणे,तेजस राणे,निसार शेख,विलास गुडेकर,रोहित राणे,सरपंच प्रमोद कावले,सुदाम तेली आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.चिरेखाण बंदी सरकारने उठवली !सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरीकांना घर बांधणीसाठी जांभा चिरा आवश्यक असल्याने चिराबंदी उठवण्यात आली आहे. पूर्वीप्रमाणेच छोट्या लिज धारकांना परवानगी देण्यात येणार आहे.जिल्ह्यातील वन्यसंज्ञा,आकारीपड व प्रलंबित महसूल प्रश्न मार्गी लावण्यात येतील.शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनाचा आढावा या दौर्‍यात घेण्यात येणार आहे. कोकणातील निसर्ग सौंदर्य सुंदर आहे . त्यामुळे कोकणातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. संघटनात्मक बांधणी करतानाच जिल्ह्यातील प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेत आहेत. असे मंत्री अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारsindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरीKankavliकणकवलीShiv Senaशिवसेना