कोकणातल्या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष पॅकेज मागणार; आदित्य ठाकरेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 17:05 IST2019-08-19T17:04:13+5:302019-08-19T17:05:40+5:30

कोकणातल्या पूरग्रस्त गावांसाठी विशेष पॅकेज दिले जावे यासाठी लवकरच मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Will ask for a special package for Konkan by aditya thackeray | कोकणातल्या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष पॅकेज मागणार; आदित्य ठाकरेंची घोषणा

कोकणातल्या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष पॅकेज मागणार; आदित्य ठाकरेंची घोषणा

सावंतवाडी : कोकणातलं नुकसान बघितल्यात खूप मोठं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे कोकणातल्या पूरग्रस्त गावांसाठी विशेष पॅकेज दिले जावे यासाठी लवकरच मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ते बांदा येथे पत्रकारांशी बोलत होते. पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केल्यानंतर तेथील ग्रामस्थ जी निवेदने देत आहेत. त्या निवेदनातील प्रमुख मागण्या या मुख्यमंत्र्यासमोर मांडणार असल्याचे ही त्यांनी जाहीर केले.

कोल्हापूर, सांगलीप्रमाणे सावंतवाडी व दोडामार्गला पुराचा तडाखा बसला आहे. ही गावे उभी राहिली पाहिजेत, यासाठी आमचा प्रयत्न आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून मदत मिळतच आहे. कारण अनेक रस्ते वाहून गेले आहेत. गावाचा संपर्क तुटला हे सर्व बघितल्यानंतर भयानक परस्थिती आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसमवेत दोडामार्गसह सावंतवाडीतल्या पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या आहेत. 

Web Title: Will ask for a special package for Konkan by aditya thackeray