शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

गुड न्यूज: 'वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग' ठरताहेत मुक्या जीवांचे देवदूत..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:31 IST

संदीप बोडवे मालवण: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यजीवांचे रक्षण आणि पुनर्वसनाचे उल्लेखनीय काम करणारी एक संस्था म्हणजे 'वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग'. ...

संदीप बोडवेमालवण: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यजीवांचे रक्षण आणि पुनर्वसनाचे उल्लेखनीय काम करणारी एक संस्था म्हणजे 'वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग'. गेल्या आठ वर्षांपासून ही संस्था निःस्वार्थपणे जिल्ह्यातील विविध प्राणी आणि पक्ष्यांना मदत करत आहे. आपत्कालीन परिस्थितीत सेवा पुरविणे, निसर्ग संवर्धन आणि त्याची जनजागृती या कामातही संस्थेने अल्पावधीतच आपला वेगळा ठसा उमटविला आहे. मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या मुक्या हतबल जीवांसाठी ही संस्था देवदूतच ठरत आहे.

संकटात सापडलेल्या वन्यजीवांना तात्काळ मदत पुरविण्यात यावी या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही आणि मित्रांनी एकत्र येत वाईल्ड लाईफ रेस्क्युअर सिंधुदुर्ग या संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेच्या प्राणी मित्रांनी संकटात सापडलेल्या शेकडो जीवांना नवे जीवन दिले आहे.अशाच एका घटनेमध्ये लहानपणी बांधलेला बेल्ट कुत्रा मोठा होत होता तसा त्याच्या गळ्यात रूतत गेला. मुक्या जनावरांना काय कळणार? त्याला काहीच करता येईना. त्या कुत्र्याच्या आईने व तिथल्या स्थानिकांनी प्रयत्न केला पण तो पट्टा काही निघेना. गेले आठ दिवस स्थानिकांनी खूप प्रयत्न केले पण कुत्रा हातही लावून घेत नव्हता. शेवटी सिंधुदुर्ग वाइल्ड रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्या टिमने आपल्या कौशल्यावर त्या कुत्र्याला या संकटातून वाचवले. मानेमध्ये पूर्ण रुतलेला बेल्ट काढून त्यावर उपचार करून त्याला जीवदान दिले. 

संस्थेचे कार्यक्षेत्रभटकी जनावरे आणि वन्यजीवांचा बचाव: रस्ते अपघात, विहिरीत पडणे, जाळ्यात अडकणे अशा विविध परिस्थितीत अडकलेल्या प्राण्यांना सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा पुरवणे. प्राणी आणि पक्ष्यांना कोणत्याही प्रकारच्या आपत्तीच्या वेळी मदत करणे. लोकांमध्ये वन्यजीवांबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि त्यांच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे. उन्हाळ्यात पक्षी, कीटक आणि इतर प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वॉटर बॉल्स बसवणे. संस्थेने केलेले उल्लेखनीय कामसंस्थेने आतापर्यंत १०० कॅन्सरग्रस्त कुत्रे, १५ स्नेक बाईट कुत्रे, १५ कुत्रे ड्रेनेज आणि विहिरीतून वाचवले आहेत. तसेच, जाळ्यात अडकलेले साप, माकड, समुद्री कासव, पक्षी आणि विहिरीत पडलेले कोल्हे, मगरी, जंगली मांजर, गायी आणि वासरं यांनाही नवजीवन दिले आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्या कुत्रे, गायी आणि माकडांना वैद्यकीय सुविधा पुरवून त्यांना पुनर्स्थापित केले आहे. मोकाट जनावरांना रस्ते अपघातांपासून वाचवण्यासाठी त्यांच्या गळ्यात रेडियम बेल्ट बसवले आहेत. पक्षी, कीटक आणि इतर प्राण्यांना उन्हाळ्यात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी १५००वॉटर बॉल्स बसवले आहेत. संस्थेला आर्थिक मदत करून प्रोत्साहन द्याडॉ. प्रसाद धुमक, ओमकार लाड, विष्णू मसके, कृष्णा कदम, दीपक दुतोंडकर, सिद्धेश ठाकूर, संदीप चिऊलकर, शिल्पा खोत, दर्शन वेंगुर्लेकर हे संस्थेचे सदस्य आहेत. वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्यजीवांचे खरे मित्र आहेत. त्यांचे हे उल्लेखनीय कार्य पाहून आपल्या मनातही वन्यजीवांबद्दल प्रेम आणि आदर निर्माण होतो. या संस्थेला आपल्या सहकार्याची गरज आहे. आपणही या उमद्या कामात सहभागी होऊन या संस्थेला आर्थिक मदत करून त्यांना प्रोत्साहन देऊ शकता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग