शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

..तेव्हा राजीनामा का दिला नाही?; मराठा आरक्षणावरुन नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल 

By सुधीर राणे | Updated: November 1, 2023 14:05 IST

जरांगे-पाटील यांनी राजकीय बोलू नये, हा मैत्रीचा सल्ला!

कणकवली: उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षण रद्द झाले. तेव्हा नैतिकता पाळून त्यांनी राजीनामा का दिला नाही? राजीनामा देण्याची प्रथम त्यांनी आपल्या घरातून सुरवात करावी. त्यांच्या पक्षातील खासदार,आमदार यांचे राजीनामे घ्यावेत. मगच दुसऱ्यांना राजीनामा द्यायला त्यांनी सांगावा. तशी हिम्मत उद्धव ठाकरे यांनी दाखवावी. असे आव्हान  आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. कणकवली येथे बुधवारी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. नितेश राणे  म्हणाले, संजय राऊत हे एका बाजूला राज्यातील सरकार घटनाबाह्य आहे असे म्हणतात. तर दुसऱ्या बाजुला सरकारच्या बैठकीला यायची त्यांची इच्छा आहे. आजच्या बैठकीला त्यांना बोलावले नाही. त्याबद्धल मी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानतो.आमचे सरकार टिकणारे आरक्षण देणार आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी राजकीय भाषा सुरू केली आहे.त्यांना जो कोण स्क्रिप्ट लिहून देत आहे, त्यांनी शांततेत चाललेल्या आंदोलनाला गाल बोट लावू नये.  हिंसेचे समर्थन करू नये, जाळपोळ करत असतील तर त्यांना आपण शिवरायांचे मावळे म्हणू नये. जे दोषी नसतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही. याची आम्ही खात्री देतो. कोणावर चुकीची कारवाई होत असेल तर आम्ही त्यांना मदत करू असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला स्वतःचे चिन्ह, नाव आहे का? त्यामुळे चिरीमिरी लोकांना, दंगल भडकवणाऱ्यांना सर्वपक्षीय बैठकीला बोलावले नाही.असे सांगताना अंबादास दानवेना बोलावले होते. ते तुमच्या पक्षाचे नाहीत का ?याचे उत्तर राऊत यांनी द्यावे.मातोश्रीचे पण इंटरनेट बंद करावे. तिथूनच दंगली भडकविल्या जातात.असा आरोपही नितेश राणे यांनी यावेळी केला. तसेच शांतता ठेवण्यासाठी इंटरनेट बंद करावे लागते. मात्र, सरपंच पदाची कधी निवडणूक लढविली नाही, त्याना राज्य कसे चालवावे हे समजणार नाही.असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

जरांगे-पाटील यांनी राजकीय बोलू नये, हा मैत्रीचा सल्ला!माझी किंमत भाजपला माहीत आहे. तुमची किंमत जर ठेवायची असेल तर जरांगे-पाटील यांनी राजकीय बोलायचे बंद करावे.हा माझा त्यांना मैत्रीचा सल्ला आहे. आमदारांची घरे ,गाड्या फोडणारे मराठा समाजातील नाहीत. ते ठाकरे व पवारांचे हस्तक आहेत.प्रदीप साळुंखे व बनसोडे हे कोणाचे पिल्लू आहेत याचे उत्तर राऊत यांनी द्यावे.असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaratha Reservationमराठा आरक्षणNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे