शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

Maharashtra Vidhan Sabha 2019: कणकवली विधानसभा मतदार संघात कोणात होणार लढत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 3:31 PM

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना आणि भाजपची युती होणारच , असे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अनेकवेळा जाहीरपणे सांगितले आहे . त्यामुळे कणकवली मतदारसंघात युतीचा उमेदवार कोण असणार ? याची उत्सुकता मतदारांसह कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे . त्याचबरोबर भाजप व शिवसेना युती झाली नाही तर त्यांचे उमेदवार कोण असतील ? अथवा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजप मध्ये विलीन झाला तर नेमकी काय स्थिती असेल याबाबतही सध्या कणकवली विधानसभा मतदार संघात तर्क वितर्क लढविले जात आहेत.

ठळक मुद्देमतदारांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था राणे , पारकर , रावराणेंची नावे चर्चेत

सुधीर राणे कणकवली : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना आणि भाजपची युती होणारच , असे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अनेकवेळा जाहीरपणे सांगितले आहे . त्यामुळे कणकवली मतदारसंघात युतीचा उमेदवार कोण असणार ? याची उत्सुकता मतदारांसह कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे . त्याचबरोबर भाजप व शिवसेना युती झाली नाही तर त्यांचे उमेदवार कोण असतील ? अथवा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजप मध्ये विलीन झाला तर नेमकी काय स्थिती असेल याबाबतही सध्या कणकवली विधानसभा मतदार संघात तर्क वितर्क लढविले जात आहेत.विधानसभा निवडणुकीच्या अनुषगाणे कणकवली मतदारसंघातील विद्यमान आमदार नीतेश राणे यांनी 'सेकंड ईनिंग साठी ' जोरदार कंबर कसली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसच्यावतीने निवडणूक लढवून ते मोठ्या मताधिक्याने तत्कालीन आमदार प्रमोद जठार यांचा पराभव करून विजयी झाले होते. आता बदलत्या राजकीय समिकरणांनुसार ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून निवडणूक लढविणार की त्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनिकरण झाले तर भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढविणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.मात्र, असे जरी असले तरीही नितेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे . फेसबुक , व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांच्या प्रचाराचे लेख आणि व्हिडिओ , त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने प्रसारीत केले जात आहेत . तर भाजपच्यावतीने कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर व अतुल रावराणे यांनीही मतदारसंघांत कार्यकत्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू ठेवले आहे . छत्र्या, रेनकोट , टीशर्ट असे साहित्य मतदारापर्यंत पोचविल्यानंतर गणशोत्सवात शिधा सामग्री देखील मतदारापर्यंत पोच केली आहे .शिवसेना भाजप युतीच्या जागा वाटपात सिंधुदुर्गातील कणकवली विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आलेला आहे . तसेच युती होणारच या शक्यतेने शिवसेनेकडून कुणा उमेदवाराने दावेदारी केलेली नाही . तर भाजपमध्ये स्वाभिमान पक्ष विलीन न झाल्यास , या पक्षातील एक बडा नेता कणकवली मतदारसंघात भाजपचा उमेदवार म्हणून पुढे येईल अशीही चर्चा गेले काही दिवस रंगली आहे .कणकवली मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा बालेकिल्ला असल्याचे मानले जाते. या मतदारसंघातील कणकवलीसह वैभववाडी आणि देवगड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राणे समर्थकांचा वरचष्मा आहे . नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणकीत कणकवली मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे यांना युतीच्या विनायक राऊत यांच्यापेक्षा १०, ७३१ चे मताधिक्य मिळाले आहे .

त्याच पाठबळावर विद्यमान आमदार नीतेश राणे यांना या मतदारसंघात विजयाचा विश्वास आहे . मात्र त्यांच्यासमोर भाजप - शिवसेना युतीचा उमेदवार उभा राहिला आणि एकास एक लढत झाली तर खऱ्या अर्थाने चुरस होवू शकते याची कल्पना खुद्य राणेंना देखील आहे . त्यादृष्टीने त्यांनीही मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे .महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होईल आणि कणकवली मतदारसंघात नीतेश राणे हे भाजपचे उमेदवार असतील असाही अंदाज स्वाभिमान कार्यकत्यांकडून वर्तविण्यात येत आहे . तसे झाले तर भाजप - शिवसेना युतीचे नीतेश राणे हे उमेदवार असतील ; मात्र त्यांना शिवसैनिकांची किती साथ मिळेल ? हा खरा प्रश्न आहे.काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या पदाधिकाऱ्यांची चाचपणी केली असली तरी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. तसेच आघाडी करून दोन्ही पक्ष लढणार का ? हेही स्पष्ट केलेले नाही. तर मनसे, वंचीत बहुजन आघाडी , रिपब्लिकन पक्ष यांनीही आपली नेमकी भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे सध्या तरी कणकवली विधानसभा मतदार संघात कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार असणार याबाबत नेमका अंदाज बांधता येत नसल्याने मतदारांमध्ये सध्या तरी संभ्रमावस्था आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019sindhudurgसिंधुदुर्ग