नागपंचमीच्या पूजेसाठी फुले काढतानाच नागाने केला दंश, युवक गंभीर; माडखोल येथील घटना
By अनंत खं.जाधव | Updated: August 21, 2023 13:16 IST2023-08-21T13:15:39+5:302023-08-21T13:16:22+5:30
सावंतवाडी : नागपंचमीसाठी पूजेचे साहित्य गोळा करत असतानाच नागाने दंश केल्याने सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील न्हानू म्हालटकर (वय-२८) हा ...

नागपंचमीच्या पूजेसाठी फुले काढतानाच नागाने केला दंश, युवक गंभीर; माडखोल येथील घटना
सावंतवाडी : नागपंचमीसाठी पूजेचे साहित्य गोळा करत असतानाच नागाने दंश केल्याने सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील न्हानू म्हालटकर (वय-२८) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज, सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शेताच्या परिसरात घडली.
नागपंचमी असल्याने पूजेसाठी आवश्यक असलेले शेरवडे तसेच फुले काढण्यासाठी न्हानू हा जवळच शेतात गेला होता. फुले काढता काढता त्या ठिकाणीच नागाने त्याला दंश केला. नाग चावल्याचे त्याने आरडाओरड केली. त्यावेळी त्याच्या नातेवाईक व शेजारी राहणाऱ्यांनी धाव घेत तात्काळ येथील कुटीर रुग्णातलयात दाखल केले. मात्र आज नागपंचमी असल्याने आणि चक्क नागानेच दंश केल्याने माडखोल सह परिसरात एकच खळबळ उडाली.