शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

नीतेश राणे कोणत्या पक्षाकडून लढणार? शिवसेनेसह विरोधक कोंडी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 6:06 AM

गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्षातील असतानादेखील विविध कंपन्यांच्या सीएसआर फंड आणि वैयक्तिक निधीतून विविध विकासकामे केली.

- महेश सरनाईकसिंधुदुर्ग : कणकवली मतदारसंघात आमदार नीतेश राणे यांनी गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्षातील असतानादेखील विविध कंपन्यांच्या सीएसआर फंड आणि वैयक्तिक निधीतून विविध विकासकामे केली. ते मतदारसंघात सतत सक्रिय असल्याने आमदारकीच्यानंतर विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये येथील जनतेने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी काँग्रेसमधून लढणारे नीतेश राणे यावेळी स्वाभिमान की भाजप कुठल्या पक्षातून लढणार याचीच प्रतीक्षा आहे. तर राणेंना पराभूत करण्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांचे सर्व राजकीय विरोधक प्रयत्न करणार आहेत.२०१४ च्या निवडणुकीत कणकवलीतून नारायण राणे यांचे सुपुत्र नीतेश राणे काँग्रेसकडून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर राणे यांनी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वतंत्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. या पक्षाने केंद्रातील एनडीए सरकारला पाठिंबा दिल्यानंतर राणे यांची भाजपने आपल्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून वर्णी लावली. त्यानंतर गेल्या दीड वर्षात नीतेश राणे यांनी मात्र, काँग्रेसचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे अजूनही ते काँग्रेसचेच आमदार आहेत.आता भविष्यात स्वाभिमान पक्षाचे भाजपमध्ये विलिनीकरण करणार असल्याचे राणे यांनी जाहीर केले आहे. मात्र, याला शिवसेनेने विरोध केल्याने शिवसेना-भाजप युतीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या पाच ते सहा दिवसांत याबाबतची गणिते स्पष्ट होतील. त्यानंतर नीतेश राणे भाजपमधून लढणार की स्वाभिमानमधून हे स्पष्ट होईल.नीतेश राणे कुठल्याही पक्षातून लढले तरी शिवसेनेचा त्यांना विरोध असणारच आहे. शिवाय, राष्टÑवादीसह इतरांची साथही सेनेला मिळू शकते.पाच वर्षांत काय घडले?आमदार झाल्यानंतर त्यावेळी स्थापन झालेल्या वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळवून दिले.त्यानंतर देवगड आणि पाठोपाठ कणकवली नगरपंचायतीवरही ताबा मिळवून मतदारसंघातील तिन्ही नगरपंचायतींवर काँग्रेस आणि नंतर स्वाभिमानचा झेंडा फडकविला.जिल्हा परिषद निवडणुकीत कणकवली तालुक्यात आठही सदस्य निवडून आणत एकतर्फी वर्चस्व मिळविले.लोकसभा निवडणुकीत स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केवळ कणकवली मतदार संघातूनच दहा हजारांचे मताधिक्य मिळाले. ते केवळ नीतेश राणे यांनी घेतलेल्या मेहनतीचेच फळ होते.>निवडणूक २०१४ंनीतेश राणे (काँग्रेस)७४७१५ मतेप्रमोद जठार (भाजप)३८७३६ मतेसुभाष मयेकर (शिवसेना)१२८६३ मते>संभाव्य प्रतिस्पर्धीसंदेश पारकर (भाजप)अतुल रावराणे (भाजप)विजय सावंत (काँग्रेस)अभिनंदन मालंडकर (राष्ट्रवादी)>विरोधी पक्षातील आमदार असूनदेखील केवळ निधीबाबत ऊहापोह न करता विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून मतदारसंघात डिजिटल शाळांचा उपक्रम राबविला. तसेच स्व-खर्चातून क्रिकेट अकादमी, कंटेनर थिएटर, वॅक्स म्युझियम यासारखे उपक्रम राबवून लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविला.- नीतेश राणे, आमदार, कणकवली मतदारसंघ

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे