नीतेश राणे कोणत्या पक्षाकडून लढणार? शिवसेनेसह विरोधक कोंडी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 06:06 AM2019-09-15T06:06:05+5:302019-09-15T06:06:46+5:30

गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्षातील असतानादेखील विविध कंपन्यांच्या सीएसआर फंड आणि वैयक्तिक निधीतून विविध विकासकामे केली.

From which party will Nitesh Rane fight? Opposition along with Shiv Sena will strike | नीतेश राणे कोणत्या पक्षाकडून लढणार? शिवसेनेसह विरोधक कोंडी करणार

नीतेश राणे कोणत्या पक्षाकडून लढणार? शिवसेनेसह विरोधक कोंडी करणार

googlenewsNext

- महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : कणकवली मतदारसंघात आमदार नीतेश राणे यांनी गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्षातील असतानादेखील विविध कंपन्यांच्या सीएसआर फंड आणि वैयक्तिक निधीतून विविध विकासकामे केली. ते मतदारसंघात सतत सक्रिय असल्याने आमदारकीच्यानंतर विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये येथील जनतेने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी काँग्रेसमधून लढणारे नीतेश राणे यावेळी स्वाभिमान की भाजप कुठल्या पक्षातून लढणार याचीच प्रतीक्षा आहे. तर राणेंना पराभूत करण्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांचे सर्व राजकीय विरोधक प्रयत्न करणार आहेत.
२०१४ च्या निवडणुकीत कणकवलीतून नारायण राणे यांचे सुपुत्र नीतेश राणे काँग्रेसकडून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर राणे यांनी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वतंत्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. या पक्षाने केंद्रातील एनडीए सरकारला पाठिंबा दिल्यानंतर राणे यांची भाजपने आपल्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून वर्णी लावली. त्यानंतर गेल्या दीड वर्षात नीतेश राणे यांनी मात्र, काँग्रेसचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे अजूनही ते काँग्रेसचेच आमदार आहेत.
आता भविष्यात स्वाभिमान पक्षाचे भाजपमध्ये विलिनीकरण करणार असल्याचे राणे यांनी जाहीर केले आहे. मात्र, याला शिवसेनेने विरोध केल्याने शिवसेना-भाजप युतीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या पाच ते सहा दिवसांत याबाबतची गणिते स्पष्ट होतील. त्यानंतर नीतेश राणे भाजपमधून लढणार की स्वाभिमानमधून हे स्पष्ट होईल.
नीतेश राणे कुठल्याही पक्षातून लढले तरी शिवसेनेचा त्यांना विरोध असणारच आहे. शिवाय, राष्टÑवादीसह इतरांची साथही सेनेला मिळू शकते.
पाच वर्षांत काय घडले?
आमदार झाल्यानंतर त्यावेळी स्थापन झालेल्या वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळवून दिले.
त्यानंतर देवगड आणि पाठोपाठ कणकवली नगरपंचायतीवरही ताबा मिळवून मतदारसंघातील तिन्ही नगरपंचायतींवर काँग्रेस आणि नंतर स्वाभिमानचा झेंडा फडकविला.
जिल्हा परिषद निवडणुकीत कणकवली तालुक्यात आठही सदस्य निवडून आणत एकतर्फी वर्चस्व मिळविले.
लोकसभा निवडणुकीत स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केवळ कणकवली मतदार संघातूनच दहा हजारांचे मताधिक्य मिळाले. ते केवळ नीतेश राणे यांनी घेतलेल्या मेहनतीचेच फळ होते.
>निवडणूक २०१४
ंनीतेश राणे (काँग्रेस)
७४७१५ मते
प्रमोद जठार (भाजप)
३८७३६ मते
सुभाष मयेकर (शिवसेना)
१२८६३ मते
>संभाव्य प्रतिस्पर्धी
संदेश पारकर (भाजप)
अतुल रावराणे (भाजप)
विजय सावंत (काँग्रेस)
अभिनंदन मालंडकर (राष्ट्रवादी)
>विरोधी पक्षातील आमदार असूनदेखील केवळ निधीबाबत ऊहापोह न करता विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून मतदारसंघात डिजिटल शाळांचा उपक्रम राबविला. तसेच स्व-खर्चातून क्रिकेट अकादमी, कंटेनर थिएटर, वॅक्स म्युझियम यासारखे उपक्रम राबवून लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविला.
- नीतेश राणे, आमदार, कणकवली मतदारसंघ

Web Title: From which party will Nitesh Rane fight? Opposition along with Shiv Sena will strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.