शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

कुठे नेऊन ठेवलाय गणवेश यांचा...

By admin | Updated: November 14, 2014 23:16 IST

परंतु सद्यस्थितीत एकही रिक्षाचालक गणवेश परिधान करत नाही. शिवाय त्याबाबत रिक्षाचालकांनाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रिक्षा वाहतूक करणाऱ्यांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे गणवेश निश्चित करण्यात आला आहे. परंतु सद्यस्थितीत एकही रिक्षाचालक गणवेश परिधान करत नाही. शिवाय त्याबाबत रिक्षाचालकांनाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील १४ हजार ६८६ रिक्षाचालकांना परवाना देण्यात आला आहे. रिक्षा चालकांसाठी गणवेश निश्चित करण्यात आला आहे. परमीटमालकाला पांढरा, तर चालकाला खाकी रंगाचा गणवेश सक्तीचा करण्यात आला आहे. तत्कालिन वाहतूक अधीक्षक राजीव मुठाणे यांनी गणवेश सक्तीचा केला होता. त्यानुसार सर्व रिक्षा चालक - मालक गणवेशातच वाहतूक करताना दिसून येत होते. मुठाणे यांची बदली झाल्यानंतरही काही महिने रिक्षाचालक गणवेशात वाहतूक करीत होते. परंतु सध्या एकही रिक्षाचालक गणवेशात दिसून येत नाही.वाहतूक पोलीस सर्वत्र कार्यरत असताना, त्यांच्याकडून कारवाई सुरू आहे. गर्दीच्या वेळी शहराबरोबर शहरात प्रवेश करणाऱ्या नाक्यावरही त्यांची तपासणी सुरू असते. असे असताना त्यांच्या पुढ्यातून रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करीत असतात. त्यांना गणवेश न वापरणारे रिक्षा चालक दिसत नाहीत का? असा सवाल निर्माण होत आहे.चालकांसाठी गणवेशाबाबत नियम बनविला जात असेल तर तो शिथिल का केला जातो. मुंबईसारख्या मोठ्या शहरातील रिक्षा, टॅक्सीचालक खाकी रंगाचा गणवेश परिधान करतात. परंतु रत्नागिरीत नियमाचे काही दिवसच पालन केले जाते, तद्नंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या...’ प्रमाणे सुरू आहे.काही रिक्षाचालकांकडे चर्चा केली असता गणवेश सध्या कोणीच वापरत नसल्याचे कबूल केले. वाहतूक पोलीसदेखील सक्ती करीत नाहीत. सहा महिन्यांपूर्वी रिक्षाचालक गणवेश परिधान करीत होते. रत्नागिरी शहरात रिक्षांची संख्या वाढत आहे. रिक्षा थांब्यावर रिक्षा उभ्या असतात. दिवसाला रिक्षा व्यवसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्न कमी आहे. पेट्रोल, बँक हप्ता, देखभाल दुरूस्ती खर्च वजा जाता रिक्षा चालकांना मिळणारे उत्पन्न अल्प आहे. खाकी गणवेश ठीक आहे. परंतु पांढरा गणवेश कच्च्या रस्त्यामुळे खराब होतो. त्यामुळे पांढऱ्या रंगाचा गणवेश रद्द करून केवळ खाकी गणवेश करण्यात यावा. (प्रतिनिधी)