व्यापाऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरावे लागेल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 15:26 IST2021-06-12T15:23:34+5:302021-06-12T15:26:32+5:30
corona virus Sindhudurg : कोरोना टेस्टची सक्ती व्यापाऱ्यांवरच का? प्रशासनाने व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन सामोपचाराने मार्ग काढावा अन्यथा व्यापाऱ्यांच्या बाजूने आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी दिला आहे.

व्यापाऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरावे लागेल!
मालवण : कोरोना टेस्टची सक्ती व्यापाऱ्यांवरच का? प्रशासनाने व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन सामोपचाराने मार्ग काढावा अन्यथा व्यापाऱ्यांच्या बाजूने आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी दिला आहे.
कोरोना बाधित व्यक्ती सापडल्यास त्यांना विलगिकरण करून ठेवण्यास चांगल्या सोयीसुविधा अथवा विलगिकरण कक्ष मालवण पालिकेकडे उपलब्ध नाही. असे असताना व्यापारी, व्यावसायिक, भाजी विक्रेते, मच्छिविक्रेते, स्टॉलधारक व संकुलातील दुकानदार यांना कोरोना टेस्टची सक्ती मुख्याधिकाऱ्यांकडून का केली जाते ?
व्यापाऱ्यांना वारंवार त्रास कशासाठी? प्रशासनाने व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन सामोपचाराने मार्ग काढावा अन्यथा व्यापाऱ्यांच्या बाजूने आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी दिला आहे.