आमची कोणाही विरोधात तक्रार नाही, उमेश यादव यांच्या मुलीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 05:09 PM2020-01-08T17:09:41+5:302020-01-08T17:12:06+5:30

सावंतवाडी येथील विद्युत विभागाचे खासगी ठेकेदार उमेश यादव आत्महत्या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले असून, कुटुंबीयांच्यावतीने मृत उमेश यांच्या मुलीने पत्रकार परिषद घेऊन आपली कोणाविरोधात तक्रार किंवा संशय नसल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांना तपासकामात सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

We do not have any complaint against anybody, information about Umesh Yadav's daughter: Will cooperate in the investigation | आमची कोणाही विरोधात तक्रार नाही, उमेश यादव यांच्या मुलीची माहिती

आमची कोणाही विरोधात तक्रार नाही, उमेश यादव यांच्या मुलीची माहिती

Next
ठळक मुद्देआमची कोणाही विरोधात तक्रार नाही, उमेश यादव यांच्या मुलीची माहिती तपासात सहकार्य करणार

सावंतवाडी : येथील विद्युत विभागाचे खासगी ठेकेदार उमेश यादव आत्महत्या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले असून, कुटुंबीयांच्यावतीने मृत उमेश यांच्या मुलीने पत्रकार परिषद घेऊन आपली कोणाविरोधात तक्रार किंवा संशय नसल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांना तपासकामात सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

उमेश यादव यांनी चार दिवसांपूर्र्वीे येथील मोती तलावात आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास सध्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. या प्रकरणानंतर प्रथमच यादव यांची मुलगी कृतिका यादव हिने आपली बाजू सर्वांसमोर मांडली आहे. घडलेल्या घटनेनंतर राजकीय पक्षांचे नेते तसेच कार्यकर्ते आमच्या कुटुंबाच्या भेटीसाठी आले होते. त्या सर्व नेत्यांचे आभार मानत असल्याचे तिने सांगितले.

आम्ही पोलिसांना तपासकामात सर्व सहकार्य केले आहे. तसे पोलिसांनीही आम्हांला सहकार्य केले आहे. माझ्या वडिलांनी जी आत्महत्या केली आहे त्याबद्दल आम्हांला कोणावरही संशय नाही. तसेच वडिलांच्या आत्महत्या प्रकरणात चाललेले राजकारणही बंद करावे, असे आवाहनही कृतिका यादव यांनी पत्रकारांसमोर केले आहे.

Web Title: We do not have any complaint against anybody, information about Umesh Yadav's daughter: Will cooperate in the investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.