शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

देवघर मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 13:16 IST

कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम प्रकल्प ६२.०० टक्के भरला असून या धरणाच्या विमोचकातून सध्या ३४.७७ घ.मी. प्रति सेकंद विसर्ग सुरू आहे. सध्या या धरणात ६0.७७४0 द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ८४.४0 मि.मी. इतका पाऊस झाला असून १९४0.३0 मि.मी. इतका एकूण पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देवेंगुर्ले तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरूच

सिंधुदुर्गनगरी : कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम प्रकल्प ६२.०० टक्के भरला असून या धरणाच्या विमोचकातून सध्या ३४.७७ घ.मी. प्रति सेकंद विसर्ग सुरू आहे. सध्या या धरणात ६0.७७४0 द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ८४.४0 मि.मी. इतका पाऊस झाला असून १९४0.३0 मि.मी. इतका एकूण पाऊस झाला आहे.

यंदाच्या वर्षी घळभरणी झालेल्या अरुणा प्रकल्पामध्ये ४0.८५ टक्के पाणीसाठा झाला असून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १४0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत २0२0.२0 मि.मी एकूण पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २२७.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.नाधवडे, सनमटेंब आणि तिथवली लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून नाधवडेत ९७.९२ टक्के, सनमटेंब - ९५.८२ टक्के आणि तिथवली - ८0.६२ टक्के आहे. ओझरम लघु पाटबंधारे प्रकल्पातून १८.५९ घ.मी. प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. तिलारी आंतरराज्य प्रकल्प ७५.७८ टक्के भरला असून धरणात सध्या ३३९.00८0 द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात २७.४0 मि.मी पाऊस झाला असून १८९९.६0 मि.मी. एकूण पाऊस झाला आहे.सरासरी गतवर्षी पेक्षा ५७९ मिलीमीटरने घटली१ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी १६०५ मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यात सरासरी २१८४.७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ८७.२ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला आहे.

तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग ८३ (१८०३), सावंतवाडी ४५ (१३५९), वेंगुर्ले २२७.६ (१८३७.०४), कुडाळ ८८ (१५९३), मालवण ४७ (१३१३), कणकवली ११४ (१८४४), देवगड १८ (१२५६), वैभववाडी ७५ (१८४३) पाऊस झाला आहे.

टॅग्स :Damधरणsindhudurgसिंधुदुर्ग