माटणे निर्वाचक गणाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 18:06 IST2017-10-09T18:06:47+5:302017-10-09T18:06:58+5:30

पंचायत समिती दोडामार्ग पोट निवडणूकीकरीता राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचेकडील आदेशानुसार 100- माटणे तालुका दोडामार्ग या निर्वाचक गणाचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

Voters list of electoral rolls are known | माटणे निर्वाचक गणाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द

माटणे निर्वाचक गणाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द

सिंधुदुर्गनगरी दि. 09 : पंचायत समिती दोडामार्ग पोट निवडणूकीकरीता राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचेकडील आदेशानुसार 100- माटणे तालुका दोडामार्ग या निर्वाचक गणाचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

सदर पोटनिवडणूकीसाठी दिनांक 3 ऑक्टोबर 2017 रोजी आस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन 100- माटणे तालुका दोडामार्ग या निर्वाचक गणाची प्रारुप मतदार यादी तयार केली असून ती यादी दिनांक 10 ऑक्टोबर 2017 रोजी तहसिलदार दोडामार्ग तथा प्राधिकृत अधिकारी यांनी प्रसिध्द केलेली आहे.

या प्रारुप मतदार यादीची प्रत जिल्हाधिकारी/ तहसिलदार यांचे कार्यालयामध्ये पहाणेसाठी व निरिक्षणासाठी उपलब्ध आहे. या यादीसंदर्भात नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या दिनांक 17 ऑक्टोबर 2017 रोजी पर्यंत तहसिलदार दोडमार्ग यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत लेखी सादर कराव्यात.

या दिनांकानंतर प्राप्त झालेल्या हरकती/ सूचनांचा विचार करण्यात येणार नाह, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी प्रसिध्दीसाठी पाठविलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: Voters list of electoral rolls are known