शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जिंकण्यासाठी इच्छुकांकडून मतदारांची अदलाबदल, वैभववाडीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 12:22 IST

vaibhavwadi, Tahsail, sindhudurg, MNS , Shiv Sena, Voting वैभववाडी नगरपंचायतीचे प्रभाग जाहीर झाल्यानंतर निवडणुकीसाठी पर्यायाच्या शोधात असलेल्या इच्छुकांमध्ये अन्य प्रभागातील मतदारांची नावे सोयीच्या प्रभागात समाविष्ट करण्याची जोरदार स्पर्धा दिसून येत आहे.

ठळक मुद्दे जिंकण्यासाठी इच्छुकांकडून मतदारांची अदलाबदल, वैभववाडीतील प्रकार शिवसेना, मनसेची तहसीलदारांकडे तक्रार

वैभववाडी : वैभववाडी नगरपंचायतीचे प्रभाग जाहीर झाल्यानंतर निवडणुकीसाठी पर्यायाच्या शोधात असलेल्या इच्छुकांमध्ये अन्य प्रभागातील मतदारांची नावे सोयीच्या प्रभागात समाविष्ट करण्याची जोरदार स्पर्धा दिसून येत आहे.

त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातील मतदारांची नावे समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे गेल्या दहा-बारा दिवसांत निवडणूक शाखेत २५० ते ३०० अर्ज दाखल झाले असून यासंदर्भात सोमवारी शिवसेना आणि मनसेने मतदार यादीत चुकीच्या पद्धतीने फेरबदल करू नये, अशी मागणी तहसीलदारांकडे केली.वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे प्रभाग आरक्षण निश्चित झाले. आरक्षण निश्चितीनंतर अनेक इच्छुकांनी अन्य प्रभागातून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.ते ज्या प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत; त्या प्रभागात इतर प्रभागातील आपल्या मर्जीतील मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी चुकीची कागदपत्रे जोडून अर्ज दाखल केले जात आहेत. त्यामुळे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात मते नेण्याची जणू स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.त्याचबरोबर अन्य गावातील हुकमी मते नगरपंचायत कार्यक्षेत्रात दाखल करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेद्‌वार यांच्यात असलेल्या स्पर्धेमुळे आतापर्यंत जवळपास ३००च्या आसपास मतदारांचे अर्ज मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याबाबत निवडणूक नायब तहसीलदारांकडे दाखल झाले आहेत.प्रभाग रचनेनंतर मतदारांची अदलाबदल प्रकिया सुरू ठेवणे पूर्णतः चुकीचे आहे. यासंदर्भात शिवसेनेचे शहरप्रमुख प्रदीप रावराणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार करीत विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे.एका कर्मचाऱ्याची राजकीय ऊठबसअन्य प्रभागातील मतदारांची नावे सोयीच्या प्रभागात समाविष्ट करण्याची इच्छुकांमध्ये चढाओढ लागलेली असतानाच गेला आठवडाभर निवडणूक शाखेतील एक कर्मचारी कार्यालयीन वेळेतही काही राजकीय लोकांसोबत दिसून येतो.

त्या कर्मचाऱ्याचे दुपार आणि रात्रीचे खाणे-पिणेही त्याच राजकीय लोकांसोबत सुरू असल्याचे अनेकांच्या नजरेतून सुटलेले नाही. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला हाताशी धरून मतदारांची अदलाबदल केली जात असल्याची चर्चा आहे.

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. परंतु चुकीच्या पद्धतीने काही प्रकार सुरू असतील तर तशा पद्धतीने नावे समाविष्ट केली जाणार नाहीत. आम्ही सर्व प्रकारची खातरजमा करू. नगरपंचायत निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी असून आपण सहाय्यक आहोत. त्यामुळे मतदार अदलाबदलीची बाब प्रांतांच्या निदर्शनास आणू दिली जाईल,- रामदास झळके, तहसीलदार, वैभववाडी

 

टॅग्स :vaibhavwadiवैभववाडीsindhudurgसिंधुदुर्गMNSमनसेShiv SenaशिवसेनाVotingमतदानTahasildarतहसीलदार