शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नापणे येथील प्रस्तावित ऊस संशोधन केंद्राच्या नियोजित जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:31 PM

वैभववाडी : जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी बुधवारी सकाळी धावत्या भेटीत नापणे येथील प्रस्तावित ऊस ...

ठळक मुद्देऊस संशोधन केंद्राच्या जागेची पाहणीकृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची नापणे येथे भेट

वैभववाडी : जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी बुधवारी सकाळी धावत्या भेटीत नापणे येथील प्रस्तावित ऊस संशोधन केंद्राच्या नियोजित जागेची पाहणी केली. ही शासकीय जागा ऊस संशोधन केंद्राला देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून कोकण कृषी विद्यापीठाने रक्कम शासनाकडे भरणा केल्यानंतर या जागेचे विद्यापीठाकडे हस्तांतरण होणार आहे.गगनबावडा तालुक्यातील वेसरफ येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्यामुळे वैभववाडीसह कणकवली राजापूर तालुक्यात ऊसाचे क्षेत्र झपाट्याने वाढत चालले आहे. त्यामुळे कोकणातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे, तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध होऊन अर्थिक प्रगती होण्यासाठी ऊस संशोधन केंद्राची आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन माजी आमदार प्रमोद जठार यांनी गेल्या दहा वर्षांपासून ऊस संशोधन केंद्रासाठी पाठपुरावा सुरु ठेवला आहे.त्यामुळे राज्य सरकारने नापणेतील सुमारे १८ एकर शासकीय जागा सरकारी दराने ऊस संशोधन केंद्राला देण्यास मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा दौऱ्यावर आलेले कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी नियोजित जागेला धावती भेट देऊन पाहणी केली.

यावेळी कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, तहसीलदार रामदास झळके, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी शेळके, उपविभागीय कृषी अधिकारी एस. डी. बागल, वेंगुर्ले कृषी संशोधन केंद्राचे सहाय्यक संचालक डॉ. बी. एन. सावंत, फोंडाघाट कृषी संशोधन केंद्राचे डॉ. विजय शेटे, तालुका कृषी अधिकारी अमोल आगवान, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, बंड्या मांजरेकर, बबलू सावंत, किशोर जैतापकर, माजी सरपंच प्रकाश जैतापकर, उदय जैतापकर, महेश गोखले अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेतीsindhudurgसिंधुदुर्ग