शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

ग्राम कृषी विकास समिती कागदावरच राहू नये;शेतकर्‍यांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 1:21 PM

Agriculture Sector, sindhdudurgnews, farmar, grampanchyat शेतीच्या सर्वांगीण विकासाबरोबरच गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग करणे तसेच अन्य उद्देश समोर ठेवून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, ही समिती फक्त कागदावरच न रहाता खऱ्या अर्थाने कृषी विकासाला दिशा देण्यासाठी व शेतकरी आर्थिक समृध्द कसा होईल या उद्देशाने ग्रामपातळीवर कार्यरत रहावी अशी अपेक्षा अनेक शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देशेतकर्‍यांची अपेक्षा ; आर्थिक समृद्धीसाठी लागावा हातभार समितीची प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये होणार स्थापना

सुधीर राणेकणकवली : शेतीच्या सर्वांगीण विकासाबरोबरच गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग करणे तसेच अन्य उद्देश समोर ठेवून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, ही समिती फक्त कागदावरच न रहाता खऱ्या अर्थाने कृषी विकासाला दिशा देण्यासाठी व शेतकरी आर्थिक समृध्द कसा होईल या उद्देशाने ग्रामपातळीवर कार्यरत रहावी अशी अपेक्षा अनेक शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.ग्राम कृषी विकास समितीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना गावातच कृषी विषयक योजनांची माहिती व मार्गदर्शन मिळेल, असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या समितीकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शेती हा ग्रामीण भागात महत्वाचा व्यवसाय आहे. अनेक कुटुबांच्या उपजिविकेचे ते साधन आहे. मात्र , हवामानातील बदल, बदलते पर्जन्यमान, कीड व रोग, सुधारित जातीचे बियाणे उपलब्ध न होणे, शेती मालाच्या दरामध्ये अचानक घसरण होणे आदी कारणांमुळे शेती व्यवसायातून शाश्वत उत्पन्न मिळेलच असे सांगता येत नाही.

या सर्व समस्यांवर ग्रामीण स्तरावर विचारविनिमय करून मार्गदर्शन होणे गरजेचे असते . त्यासाठी ग्रामस्तरावर समिती आवश्यक असल्याचे शासनाच्या लक्षात आले. त्यामुळे ग्राम कृषी विकास समिती प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा उद्देश खूप चांगला आहे .कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे या समितीने सक्षमपणे काम केल्यास सोपे होणार आहे. तसेच ग्रामीण भागात जे ठराविक ग्रामस्थ पुन्हा पुन्हा योजनांचा लाभ घेतात त्यांनाही त्यामुळे अटकाव होवू शकणार आहे. या समितीमध्ये सरपंचांसह १४ सदस्य असणार आहेत.समितीने शासनाच्या कृषी विषयक सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रसार व प्रचार करण्याबरोबरच योजनांचा नियमितपणे आढावा घ्यायचा आहे. स्थानिक स्तरावरील हवामान, पाऊस, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत लक्षात घेवून विविध प्रकारच्या पीक लागवडीसंबंधी नियोजन व शेतकर्‍यांना मार्गदर्शन करायचे आहे.दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम लागवड आदी शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी समितीने संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांना निमंत्रित करावयाचे आहे .त्यामुळे शासनाकडून अशा वेगवेगळ्या समित्या स्थापन करून ग्राम विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला जातो. तशीच ही कृषी विकास समिती असून शेतकरी वर्गातून निश्चितपणे तिचे स्वागत होणार आहे. मात्र ही समिती कागदावर न राहता खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांना दिशा देणारी ठरावी. अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत असून तसे झाले तर गावाचा आर्थिक दृष्ट्या सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.

निर्णय चांगला, अंमलबजावणी आवश्यक !शासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे. पण समिती पूर्ण क्षमतेने कार्यरत होऊन तिचा उद्देश सफल झाला पाहिजे. समितीने आपल्या कार्यकक्षेत येणाऱ्या विविध मुद्यांची अंमलबजावणी सक्षमपणे केल्यास शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल.- संदीप कदम, शेतकरी .

 

 

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रgram panchayatग्राम पंचायतsindhudurgसिंधुदुर्ग