शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

विजय वडेट्टीवार लवकरच सागर बंगल्यावर दिसतील - नितेश राणे 

By सुधीर राणे | Updated: February 19, 2024 17:48 IST

कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशभरात भाजपमध्ये अनेकांचा प्रवेश होत आहे. देशात मोदींची गॅरंटी चालते ...

कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशभरात भाजपमध्ये अनेकांचा प्रवेश होत आहे. देशात मोदींची गॅरंटी चालते हे दिसून येत आहे. त्यामुळे कोणाला अजून धक्का बसला तर नवल वाटू नये. येणाऱ्या काळात वडेट्टीवार आणि आमचे बॉस एकत्र सागर बंगल्यावर ते दिसतील असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले, विनायक राऊत यांची स्मरणशक्ती कमी झाली आहे. उद्धव ठाकरेंनी कोणत्या कडवट सैनिकांना मंत्रीपदे दिली होती, ते त्यांनी सांगावे. विकृतीचे उत्तम दर्शन म्हणजे ठाकरे सेनेची कणकवलीतील सभा होती. त्या सभेत त्या पक्षाचे अध्यक्ष आणि काही नेते जे पातळी सोडून बोलत होते त्याला विकृती म्हणतात. स्वतः आरशात पाहून  घ्यावे मग कोणी पातळी सोडली आहे ती कळेल. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण टिकवून दाखवले होते. कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि ते टिकेल. मी चुकीचे बोललो नाहीपोलिस माझे काही वाकडे करू शकत नाही ह्याचा अर्थ कोणाचा अपमान करणे असा होत नाही. तर ज्यांना जो इशारा मला द्यायचा होता त्यांना तो निश्चितच कळला आहे. मी हिंदूंची बाजू लावून धरतो. जे माझ्यावर टीका करत आहेत त्यांना मी विचारेन, मी हिंदूंची बाजू घेतोय हे चुकीचे आहे का? मी कुठेही चुकीचे बोललो नाही. जो संदेश मला द्यायचा होता तो मी दिलाय.राज ठाकरे यांचा मित्र परिवार मोठा आहे. हिंदुत्वाचा विचार असलेले ते सर्व एकत्र आले तर चांगलेच होईल. त्याच विषयाला अनुसरून आशिष शेलार त्यांना भेटले असतील. असेही नितेश राणे म्हणाले.ओवेशीनी कधी मराठी बोलण्याचा प्रयत्न केलाय? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरबी भाषा बोलून लोकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. ओवेशीनी कधी महाराष्ट्रात येऊन मराठी बोलण्याचा प्रयत्न केलाय का ? ओवेशी ज्यांची बाजू घेऊन बोलत आहेत. त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मान्य नाही. त्याबाबत त्यांनी सांगावे असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारBJPभाजपा