सभासद हाच सोसायटीचा राजा पॅनेलचा मडुरा सोसायटीत विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 15:53 IST2017-10-17T15:44:58+5:302017-10-17T15:53:36+5:30
मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी सहकार उत्कर्ष पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले. सभासद हाच सोसायटीचा राजा पॅनेलने अनपेक्षित मुसंडी मारताना विजय संपादन केला.

मडुरा सोसायटीच्या निवडणुकीत विजयानंतर जल्लोष करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नारायण उर्फ बबन राणे, उल्हास परब, संतोष परब, जगन्नाथ परब, दिलीप परब, नारायण परब आदी उपस्थित होते. (निलेश मोरजकर)
बांदा , दि. १७ : मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी सहकार उत्कर्ष पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले. सभासद हाच सोसायटीचा राजा पॅनेलने अनपेक्षित मुसंडी मारताना विजय संपादन केला.
सभासद हा सोसायटीचा राजा पॅनेलचे ७ तर सहकार उत्कर्ष पॅनेलचे ५ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत एकूण ३३३ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण २२ मते बाद ठरली.
मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार रविवारी १० संचालक जागांसाठी सोसायटीच्या सभागृहात मतदान प्रक्रिया पार पडली. सहकार उत्कर्ष पॅनेल विरोधात सभासद हा सोसायटीचा राजा पॅनेल उभे होते.
१३ संचालक असलेल्या सोसायटीत २ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर भटक्या विमुक्त जमातीचा उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. १० संचालकांच्या जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात होते.
रविवारी सकाळी ८ वाजता निवडणुकीला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला. ८९३ सभासदांपैकी ३३३ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. २२ मते बाद ठरली. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून उत्तम जाधव तर इतर मागास प्रवर्गातून प्रकाश सातार्डेकर बिनविरोध निवडून आले आहेत.
सभासद हाच सोसायटीचा राजा पॅनेलचे संतोष परब, जगन्नाथ परब, उल्हास परब, चंद्रकांत परब, स्वप्नाली परब, सुनंदा परब हे सहा व बिनविरोध निवडून आलेले उत्तम जाधव असे एकूण ७ उमेदवार निवडून आले. सहकार उत्कर्ष पॅनेलचे ज्ञानेश परब, आत्माराम गावडे, यशवंत कुबल, प्रकाश गावडे व बिनविरोध निवडून आलेले प्रकाश सातार्डेकर असे एकूण ५ उमेदवार निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी प्रेमानंद जाधव, केंद्राध्यक्ष राजन चौगुले, मतदान अधिकारी मंगेश सावंत, रामदास नाईक व कर्मचारी युवराज मांजरेकर यांनी काम पाहिले.
बांदा पोलिसांनी निवडणुकीदरम्यान चोख बंदोबस्त राखला होता. यावेळी माजी सरपंच नंदकिशोर परब, दिलीप परब, नारायण परब, राजा परब, नकुल परब, सुहास परब आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयानंतर पॅनेलप्रमुख संतोष परब यांनी सभासदांचे आभार मानले.