शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 19:26 IST

वेंगुर्ला : प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्यातील कृषि विद्यापीठांच्या कुलगुरूची “कुलगुरू समन्वय समिती”ची सभा प्रादेशिक फळ ...

वेंगुर्ला : प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्यातील कृषि विद्यापीठांच्या कुलगुरूची “कुलगुरू समन्वय समिती”ची सभा प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आली होती. सभेसाठी डॉ. बाळासाहेब सावत कोकण कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु उपस्थित होते.या सभे दरम्यान त्यांनी वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे संशोधनात्मक कार्य व प्रक्षेत्र व्यवस्थापनाबाबत सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.वेंगुर्ले येथील या सभेच्या प्रारंभी डॉ. एस. डी. सावंत यांना कर्नल कमांडर’ हे आर्मीतील NCC विभागातून पद देण्यात आल्यामुळे कुलगुरू यांचा सत्कार कुलगुरू समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. एम. भाले यांच्या हस्ते करण्यात आला. तर सर्व उपस्थित कुलगुरूंचे स्वागत डॉ. एस. डी. सावंत कुलगुरू डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांनी केले. सभेत विविध विषयाची चर्चा झाल्यानंतर सर्व कुलगुरूंची प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रास भेट आयोजित करण्यात आली.सर्वप्रथम येथील चार प्रयोगशाळेला भेट देवून येथील फळ प्रक्रिया प्रयोगशाळेत तयार केले जाणारे विविध प्रक्रिया युक्त पदार्थांची पाहणी सर्व उपस्थित कुलगुरूंनी केली. येथील उत्पादीत प्रक्रियायुक्त पदार्थाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. नंतर रोपवाटिका विभागाला त्यांनी भेट देवून कलमांची पाहणी केली. दुपारच्या सत्रात आंबा प्रक्षेत्राला भेट दिली. या प्रसंगी त्यांनी येथील लुपिन फाऊंडेशन व विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू असलेल्या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पांतर्गत विकसीत केलेल्या सुरंगीच्या कलमांची बांधणी पध्दती बाबत उपस्थितांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.सध्या बदलत्या हवामानात आंबा पिकांमध्ये अति पर्जन्यमानामध्ये चांगली येणारी फळ पिके डयुरीयन, रानबुतान, लोगान, मँगोस्टीन इत्यादी फळ पिकांची पाहणी करून विद्यापीठाने चालू केलेल्या या संशोधनाबाबत त्यांनी विद्यापीठाच्या कार्याची प्रशंसा केली. त्यानंतर येथील कृषि पर्यटन अभ्यासक्रमाला भेट देवून या प्रकल्पाची पाहणी केली.दरम्यान या भेटी प्रसंगी वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत, डॉ. व्ही. एस. देसाई, किटकशास्त्रज्ञ, डॉ. एम. एस. गवाणकर, उद्यानविद्यावेत्ता (आबा), डॉ.  एम. बी. कदम, चार प्रयोगशाळा प्रमुख, डॉ. ए. वाय. मुंज, क. किटकशास्त्रज्ञ डॉ. एम. पी. सणस, क. उद्यानविद्यावेत्ता, डॉ.  एस. व्ही. देशमुख, क. मृदशास्त्रज्ञ, एल. एस. खापरे, क. काजू पैदासकार आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गagricultureशेती