शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्ला पतंग महोत्सव : नवाबाग बीच पतंगानी फुलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 18:48 IST

वेंगुर्ले नवाबाग किना­यावर माझा वेंगुर्ला ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाचा शुभारंभ वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सावंतवाडी  : वेंगुर्ले नवाबाग किना­यावर माझा वेंगुर्ला ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाचा शुभारंभ वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.माझा वेंगुर्ला ग्रुपतर्फे येथील नवाबाग किना­यावर दोन दिवसांच्या भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी वन इंडिया काईट टीम केरळच्या सदस्यांनी पतंगबाजीचा सराव व प्रात्यक्षिके सादर केली. यानिमित्ताने या महोत्सवात शनिवारी सायंकाळी आंतरवाडा रस्सीखेच स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत नवाबाग संघ व सातेरी व्यायामशाळा यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत नवाबाग संघाने विजय मिळविला.नवाबाग संघाला यावेळी पारितोषिक वितरीत करण्यात आले. याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाचे दाभोली शाळा नं.1 चे लेझीमनृत्य, विश्व डान्स अॅकॅडमीचे क्लासीकल आणि वेस्टर्न डान्स प्रकार, जादूगार वैभव कुमार यांचे जादूचे प्रयोग, जयंत बोवलेकर, नितीन कुलकर्णी, चिन्मयी आसोलकर यांची बहारदार गीते आदींची मेजवानी उपस्थितांनी अनुभवली.

 या महोत्सवात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी प्रायोजकांतर्फे मांडवी खाडीतून नवाबाग किना­यावर जाण्यासाठी उभारण्यात आलेली तरंगती जेटी नागरिकांसाठी सेल्फी पॉर्इंट बनली होती. त्याचबरोबर वाळू शिल्पकारांनी साकारलेल्या विविध वाळू शिल्पांनीही उपस्थितांना खिळवून ठेवले. या महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी उभादांडा ग्रा.पं.चे उपसरपंच गणपत केळुसकर, वेंगुर्ले पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी, सामाजिक कार्यकर्ते शरदचंद्र चव्हाण, उद्योजक समीर बटवलकर यांनी महोत्सवास शुभेच्छा दिल्या. यावेळी माझा वेंगुर्लाचे सदस्य उपस्थीत होते

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkiteपतंगMaharashtraमहाराष्ट्र