शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

Sindhudurg: वेंगुर्ला शहराची पाणीटंचाईवर अखेर मात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:40 IST

प्रथमेश गुरव वेंगुर्ला  : स्वच्छ सुंदर वेंगुर्ला शहरात गेली बरीच वर्षे सतावत होते ते पाण्याचे संकट. ऐन पर्यटनाच्या हंगामातच ...

प्रथमेश गुरववेंगुर्ला  : स्वच्छ सुंदर वेंगुर्ला शहरात गेली बरीच वर्षे सतावत होते ते पाण्याचे संकट. ऐन पर्यटनाच्या हंगामातच पाण्याचा साठा कमी झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचे सूर उमटत होते. याचा परिणाम मुख्यत्वे करून हॉटेल व्यावसायिकांमध्ये जाणवत होता. परंतु, पाणीटंचाई मुक्त करण्याच्या घेतलेल्या ध्यासातून अखेर वेंगुर्ला शहर पाणीटंचाईमुक्त झाले आहे. गतवर्षीपासून शहरात पाणीटंचाई भासत नसल्याची माहिती नगरपरिषदेतर्फे देण्यात आली आहे.गेली काही वर्षे वेंगुर्ला शहर पाणी टंचाईच्या संकटात सापडले होते. दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी याचा ताळमेळ साधणे म्हणजे प्रशासनाला एकप्रकारची डोकेदुखी ठरली होती. पाऊस पडेपर्यंत सर्वांना पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी जानेवारी-फेब्रुवारीपासूनच पाणी कपात करणे गरजेचे बनले होते. त्यामुळे सुरुवातीला एक दिवस आड, त्यानंतर दोन दिवस तर पाऊस लांबणीवर जात असल्याचे लक्षात येताच तीन दिवस आड पाणीपुरवठा केला जायचा. पर्यटनाच्यादृष्टीने पाणी टंचाईच्या संकटावर मात करणे गरजेचे होते. दरम्यान, निशाण तलावाची अडीच मीटरने वाढवलेली उंची पाणीटंचाई दूर करण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरली.तलावाची उंची वाढविल्याने जास्त प्रमाणात पाण्याचा साठा शिल्लक राहिला. त्याचबरोबरच पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जीर्ण आणि कमकुवत झाली असल्याने फार मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होऊन पाणी वाया जात असे. यासाठी सुमारे ४० वर्षांपूर्वीच्या जुन्या पाइपलाइन बदलण्यात आल्या. त्यामुळे जीर्ण झालेल्या पाइपलाइनमधून वाया जाणारे पाणी बंद झाले. तसेच जुन्या पाइपलाइनवरचे व्हाॅल्व्ह बदलण्यात आल्यामुळे विविध भागात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरळीत झाले. तसेच वेशी भटवाडी येथील उंच भागात कमी दाबाने नळ पाणी पुरवठा होतो. त्यामुळे तेथे २०१७ पर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असे. यावर उपाय म्हणून १ लाख लिटर पाण्याची टाकी व चंद्रभागा विहीर आदी कामे मंजूर करून ती पूर्णत्वासही नेली.

नारायण तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा मानसभविष्यात नारायण तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा मानस असून यासाठी ५ कोटींच्या निधीची मागणी शासनस्तरावर केली आहे. तर शहरातील दाभोली नाक्यापर्यंत आलेले तिलारीचे पाणी निमुजगा येथील पाण्याच्या टाकीपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. या सर्व उपायांना यश आल्यास शहरात मुबलक पाणी साठा उपलब्ध होणार आहे.

नवीन विंधन विहीर बांधलीअग्निशमन केंद्राजवळ २ लाख लिटर पाण्याची टाकी व विहीर, गाडीअड्डा येथील ५० हजार लिटर पाण्याच्या टाकीजवळ नवीन विंधन विहीर बांधण्यात आली.  नारायण तलावाच्या जवळील असलेल्या विहिरीची खोली वाढविली. आनंदवाडी येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली.

आवश्यकतेनुसार तिलारीच्या पाण्याची मदत घेण्यात येणार

  • विहिरी आणि बोअरवेल यांची साफसफाई, रेन वॉटर हार्वेस्टिंग या सर्व कामांमुळे वेंगुर्ला  शहर  पाणीटंचाई मुक्त झाले आहे.
  • वेंगुर्ला नगरपरिषद सद्यस्थितीत रोज १० लाख लिटर पाणी पुरवठा करीत आहे. १५ जूनपर्यंत नागरिकांना पाणी पुरवठा होईल अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे.
  • पाऊस लांबणीवर गेल्यास आवश्यकतेनुसार तिलारीच्या पाण्याची मदत घेण्यात येणार आहे. शहरात एकूण १२५० नळधारक असून  ९६ टक्के पाण्याच्या कराची वसुली करण्यात आली आहे.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणी