खुशखबर! "वंदे भारत" एक्सप्रेस उद्या पासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 26, 2023 11:36 IST2023-06-26T11:35:57+5:302023-06-26T11:36:42+5:30
मडगावात जय्यत तयारी सुरू; पंतप्रधान भोपाळ येथून दाखवणार "हिरवा झेंडा"

खुशखबर! "वंदे भारत" एक्सप्रेस उद्या पासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार
मडगाव : बहुचर्चित ठरलेली वंदे भारत एक्सप्रेस अखेर उद्या पासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृकश्राव्य माध्यमाव्दारे मडगाव रेल्वेस्टेशनवर या गाडीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
यापूर्वी २ जून ला या एक्सप्रेसचे उद्घाटन होणार होते मात्र ओरीसा येथे मोठा रेल्वे अपघात घडल्यामुळे हे उद्घाटन अचानक रद्द करण्यात आले होते. मात्र अखेर तारीख ठरली असून सकाळी साडेनऊ वाजता हे उद्घाटन होणार आहे. यावेळी मोदी वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवणार आहे. यात आणखी पाच गाड्यांचा समावेश आहे