शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

सामाजिक वनीकरण विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनमहोत्सव

By admin | Updated: May 29, 2017 17:08 IST

रोपांच्या वाटप व विक्री दर निश्चित, शाळांना सवलत

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. २९ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. ५ जून ते १५ आॅगस्ट या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत वनीकरणासाठी लोकांना उद्युक्त करण्यासाठी शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत आहे.वनमहोत्सव हा लोकांचा कार्यक्रम व्हावा व त्याचबरोबर जनतेला वनीकरणाचे महत्व पटवून द्यावे या दृष्टीने वनमहोत्सवाच्या कालावधीत सुधारीत केलल्या सवलतीच्या दराप्रमाणे रोपांचा पुरवठा करण्यात येतो. वनमहोत्सवाचा कालावधीत हा दि. ५ जून ते दि. ३१ आॅगस्ट असा आहे. वनमहोत्सव कालावधीत रोपांचे ठरविण्यात आलेले सवलतीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. वनमहोत्सव कालावधीत वगळता इतर कालावधीत रोपांचा विक्री ना नफा, ना तोटा या तत्वावर करण्यात येणार आहे.निश्चित केलेले दर आणि रोपे भेंडी, पांगारा, खैर, अंजन, सूरु, काशिद, आॅस्ट्रलियन/ आकेशिया बाभूळ, करंज, सावर, विलायती चिंच, चिंच, आवळा, सिताफळ, शेवगा, जांभूळ, रायवळ आंबा, वड, बोर, हादगा, मोहा, कवठ, बेहडा, हिरडा, वड, उंबर, पिंपळ, बिबा, रामफळ- ६ रुपये रोपे दर. काजू, रातांबा, चारोळी -१५ रुपये रोपे दर. शिवण, बिजा, साग रोप- ७ रुपये रोपे दर. सिलव्हर ओक, स्पॅथोडीया, गुलमोहर, जॅकरांडा, अमलतास, अ‍ॅप्रोकार्पस, चाफा, रेन ट्री, पेल्टोफोरम, कांचन- ११ रुपये रोपे दर. डुपिंग, चंदन, अशोक-३0 रुपये रोपे दर. ख्रिसमस ट्री, पिवळा बांबू- ४५ रुपये रोपे दर, असे दर निश्चित केले आहेत. शाळा, संस्था यांना सवलतीत रोप पुरवठाशाळा, संस्था यांना रोप पुरवठा करण्याबाबत शासन निर्णय ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या दि. ६ आॅक्टोबर १९९७ मधील तरतुदी लागू राहतील. त्यानुसार पिशवीतील रोपांसाठी निधार्रीत केलेला दर प्रति रोप ५0 पैसे असा सवलतीचा राहणार आहे. तालुका निहाय रोपवाटीकेची ठिकाणेसावंतवाडी- च-हाठे, निरवडे. वेंगुर्ला-आडेली. कुडाळ- हुमरमळा वालावल, वेताळ बांबार्डे. मालवण- गोळवण, राठीवडे, नांदरुख. कुडाळ- मुळदे. कणकवली- कुंभवडे, दिगवळ. देवगड- दहीबांव, गवाणे. वैभववाडी- अर्चिणे, मांगवली