शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचा ‘अंकुर’ विकासाला चालना देणारा; भूसंपादन आणि बोगद्यांच्या कामाबाबत सूक्ष्म नियोजनाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:36 IST

पर्यटन विकासासह शेती, मत्स्य व्यवसायाला बळ

प्रकाश काळेवैभववाडी : कोकण आणि घाटमाथ्याला रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी प्रदीर्घ काळापासून प्रयत्नांची मशागत झाली. त्यानंतर २०१६ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बहुपर्यायी प्रस्तावांमधून सर्वात कमी खर्चाच्या आणि भौगोलिकदृष्ट्या सर्वोत्तम वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे बी रोवले. त्यानुसार ''गुगल मॅप''च्या आधारे जिऑलॉजिकल सर्वेक्षण करून रेल्वे मंत्रालयाच्या शेवटच्या स्वतंत्र अर्थसंकल्पात तरतूदही केली. त्यानंतर जवळपास आठ वर्षे अडगळीत गेलेल्या रेल्वेमार्गाच्या मुद्द्याला आता केंद्र आणि राज्य सरकारने भागीदारीतून पुढे नेण्यासाठी पाऊल टाकल्याने ‘अंकुर’ फुटू लागला आहे. त्यामुळे निश्चितच हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र लोहमार्गाने जोडण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होऊन वैभववाडी तालुक्याबरोबरच कोकणच्या पर्यटन, शेती व मासेमारीसह सर्वांगीण विकासाला ''हायस्पीड'' चालना मिळण्यास मदत होणार आहे. परंतु, हा रेल्वेमार्ग नियोजित कालखंडात पूर्ण करण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला भूसंपादन आणि बोगद्यांच्या कामाबाबत सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे.नव्वदच्या दशकात कोकण रेल्वे आकाराला येत असतानाच सुरू झाली. सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या विविध भागातून चिपळूण कराड, राजापूर कोल्हापूर, आर्चिणे (ता. वैभववाडी), दाजीपूर (ता. राधानगरी) अभयारण्यातून कोल्हापूर, सावंतवाडी-कोल्हापूर अशा बहुपर्यायी मागण्यांची मालिका सुरू झाली. परंतु, रेल्वे मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुरेश प्रभू यांनी २०१५ मध्ये मिरजेतील एका परिषदेत वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गावर एकमत केले. त्यानंतर दोन-तीन महिन्यातच वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाची घोषणा केली.तत्पूर्वीच मुंबईतील जे.पी. इजिनिअरिंग कंपनीमार्फत या रेल्वे मार्गासाठी ‘गुगल मॅप’द्वारे सॅटेलाईट सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करताना ३ हजार २०० कोटींच्या वैभववाडी-कोल्हापूर या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाची घोषणा केली. केवळ घोषणाच झाली नाही तर पुढच्याच वर्षीच्या म्हणजे २०१७ च्या अर्थसंकल्पात २५० कोटीची तरतूद केली. आणि स्वप्नवत वाटणारा हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात येईल, असे सर्वांना वाटू लागले होते.परंतु, त्यानंतर तब्बल आठ वर्षे या रेल्वे मार्गाची तसूभरही प्रगती दिसून आली नाही. त्यामुळे प्रभू यांनी रोवलेले वैभववाडी कोल्हापूर रेल्वेमार्गाचे ''बी'' गाडले जाण्याची चिन्हे दिसू लागली असतानाच २०२३ मध्ये ''पीएम गतीशक्ती'' योजनेंतर्गत ५३ व्या राष्ट्रीय नियोजन गटाच्या बैठकीत ३ हजार ४११ कोटी १७ लाखांच्या खर्चास शिफारस देण्यात आली आहे. त्यामुळे वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाची चिन्हे पुन्हा एकदा दिसू लागली होती.

रेल्वेमार्ग उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात गती येण्याची चिन्हेमागील दोन वर्षात या रेल्वे मार्गाबाबत कोल्हापूर आणि कोकणवासीयांची काहीशी निराशा झाली. दरम्यानच्या काळात केंद्रात मंत्री असताना खासदार नारायण राणे, माजी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री नितेश राणे यांच्यामार्फत या रेल्वे मार्गाचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न झाला. परंतु, आता केंद्र आणि राज्याच्या भागीदारीतून हा रेल्वे मार्ग काढण्यात येणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या जमिनीचे भूसंपादन करण्याचे निर्देश दिल्यामुळे चौथ्यांदा रेल्वेमार्गाच्या उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात गती येईल, असे स्थानिकांना वाटू लागले आहे.

असा आहे नियोजित रेल्वेमार्गवैभववाडी रोड रेल्वे स्थानक (नापणे) हे जंक्शन होणार असून या रेल्वेस्थानकातून सोनाळी, कुसूर कुंभारी, उंबर्डे, मांगवली, उपळे, ऐनारी (सिंधुदुर्ग) पुढे सैतवडे, कळे, भुये, कसबाबावडा, मार्केटयार्ड, कोल्हापूर असा १०७ किलोमीटर लांबीचा नियोजित रेल्वेमार्ग आहे. या मार्गावर दहा स्थानके, पाच मोठे पूल, २६ बोगदे, याशिवाय छोटे-मोठे पूल असणार आहेत.

पर्यटन विकासासह शेती, मत्स्य व्यवसायाला बळपर्यटन जिल्हा असूनही त्याचे मार्केटिंग होत नाही. त्यामुळे समृद्ध असलेल्या पर्यटनाला मर्यादा पडल्या आहेत. वैभववाडीपर्यंत येणारी रेल्वे भविष्यात विजयदुर्गला जोडली जाईल. त्यामुळे मत्स्योत्पादनासह आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, जांभुळ, करवंद यासह विविध फळे आणि त्यांच्या उत्पादनांची थेट वाहतूक पश्चिम महाराष्ट्रातून पुढे खानदेश, विदर्भ, मराठवाड्यापर्यंत होण्यास मदत होणार आहे. तसेच त्या भागातील शेतमाल सुरक्षितपणे थेट कोकणात येण्यास मदत होणार आहे. तसेच कोकणातील खनिज संपत्तीची वाहतूक रेल्वेमार्गाने जलदगतीने होऊ शकेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Vaibhavwadi-Kolhapur Rail Line: A Boost to Development

Web Summary : The Vaibhavwadi-Kolhapur rail line, after years of planning, is gaining momentum. It promises enhanced tourism, agriculture, and fisheries development in the Konkan region. Key challenges include land acquisition and tunnel construction, requiring meticulous planning for timely completion and economic benefits.