शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

महामार्गावरील धुरळ््यावरून वैभव नाईक यांचा रुद्रावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 5:13 PM

आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांच्या समक्षच अभियंत्याचा हात धरून फरफटत नेत त्याला महामार्गाची दुर्दशा दाखविली. अखेर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मध्यस्थीनंतर या वादावर पडदा पडला.

ठळक मुद्देअभियंत्याला खडसावले दीपक केसरकर यांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा

कुडाळ : महामार्गावर उडणाऱ्या धुरळ््यावरून आमदार वैभव नाईक यांनी दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. नेहमी शांत असणाऱ्या नाईक यांचा रुद्रावतार प्रथमच कार्यकर्त्यांनी यावेळी अनुभवला.

तुम्ही रस्त्यावर पाणी का मारत नाही? रस्त्यावर उडणारा धुरळा तुम्हांला दिसत नाही का? तुम्हांला धुरळा उडतो तिथे बांधून ठेवले पाहिजे, मगच शहाणपणा सुचेल, असे सांगून कार्यकर्त्यांच्या समक्षच अभियंत्याचा हात धरून फरफटत नेत त्याला महामार्गाची दुर्दशा दाखविली. अखेर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मध्यस्थीनंतर या वादावर पडदा पडला व आमदार नाईक शांत झाले.कुडाळ काळप नाक्यासमोरील पुलावर महामार्गाचे काम सुरू असून, तेथे उडणाऱ्या धुरळ्यामुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आमदार नाईक यांनी दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

जिथे धुरळा उडतो तिथे तुम्हांला बांधून ठेवले पाहिजे. मगच इतरांना होणाऱ्या त्रासाची जाणीव होईल, असे सांगत तेथे असलेल्या अभियंत्याचा हात धरून त्याला महामार्गावरून इकडे-तिकडे फिरवून महामार्गाची दयनीय अवस्था त्यांनी दाखविली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, अतुल बंगे, तालुकाप्रमुख राजन नाईक, नगरसेवक सचिन काळप, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे, सागर भोगटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.पालकमंत्र्यांनीही अधिकाऱ्यांना सुनावलेयावेळी पालकमंत्री दीपक केसरकर हे जिल्हा मुख्यालयात जात होते. हा प्रकार पाहून त्यांनी आपल्या वाहनांचा ताफा तेथेच थांबविला. अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा करून त्यांनी आमदार नाईक यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. महामार्गावरील उडणाऱ्या धुळीमुळे लोक आम्हांला विचारतात.

हे सर्व तुमच्या हलगर्जीपणाने होते, असे सांगून संताप व्यक्त केला. यावर कंपनीचे अधिकारी निरूत्तर झाले. अखेर पालकमंत्री केसरकर यांनी असे परत होणार नाही याची दखल घ्या, असे अधिकाºयांना सुनावून तसे लिहूनही घेतले. त्यानंतर या वादावर पडदा पडला.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग