शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई -गोवा महामार्ग बंद आंदोलनाबाबत विधानसभेत औचित्याचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 15:57 IST

कुडाळ बचाव समितीने मंगळवार १७ जुलै रोजी पुकारलेल्या आंदोलनाची गंभीर दखल कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी घेत सोमवारी विधानसभेत औचित्याचा  मुद्दा उपस्थित केला. या महत्वाच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले. शासनाकडे पाठविलेल्या ११० कोटी ७६ लाख रुपये प्रस्तावाला तत्काळ मंजुरी मिळावी अशी मागणी केली. 

ठळक मुद्देमुंबई -गोवा महामार्ग बंद आंदोलनाबाबत विधानसभेत औचित्याचा मुद्दावैभव नाईक यांनी वेधले लक्ष, प्रस्तावावर त्वरीत कार्यवाहीची मागणी 

नागपूर : कुडाळ बचाव समितीने मंगळवार १७ जुलै रोजी पुकारलेल्या आंदोलनाची गंभीर दखल कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी घेत सोमवारी विधानसभेत औचित्याचा  मुद्दा उपस्थित केला. या महत्वाच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले. शासनाकडे पाठविलेल्या ११० कोटी ७६ लाख रुपये प्रस्तावाला तत्काळ मंजुरी मिळावी अशी मागणी केली. 

कुडाळ शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण क्रमांक ६६ मध्ये कुडाळ शहरांत प्लाय ओव्हर व्हावे तसेच आवश्यक त्या ठिकाणी बॉक्सवेल व अंडरपास बांधण्यात यावे, अशी मागणी कुडाळ बचाव समितीच्यावतीने करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर प्रशासनाने अपेक्षित कारवाई केली नाही. ठेकेदार कंपनी मनमानी करत आहे. त्यातच अपेक्षित माहिती न दिल्याने बचाव समितीने महामार्ग बंदचे आपले आंदोलन कायम ठेवले आहे.हे आंदोलन अधिक तीव्र व्हावे यासाठी प्रकल्पबाधीत गावात जाऊन बचाव समितीने जनतेचे प्रबोधन केले आहे.  प्रशासनाच्यावतीने आंदोलन थांबविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे महाराष्ट्राच्या उपराजधानीत (नागपूर) सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात वैभव नाईक यांनी खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यात सुरू असलेल्या ११० कोटी ८६ लाख रुपयांच्या प्रस्तावाकडे विधानसभेत लक्ष वेधले.कुडाळ बचाव समितीने मंगळवारी पुकारलेल्या महामार्ग बंद आंदोलनाच्या पूर्वसंध्येला विधानसभेत आमदार नाईक यांच्या माध्यमातून आंदोलनाचा प्रश्न उपस्थित झाल्याने शासन हा प्रस्ताव मंजूर करते का? याकडे तमाम कुडाळ वासियांसह जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्गVaibhav Naikवैभव नाईक