शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात अवकाळी वादळी पावसाचा शिडकावा, हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 12:04 IST

भातकापणीचा हंगाम अंतिम टप्प्यात

सिंधुदुर्ग : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि काही जिल्ह्यात १४ व १५ नोव्हेंबर रोजी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. त्यानुसार कणकवली तालुक्यातील जानवली व काही भागात गुरूवारी दुपारनंतर अवकाळी पावसाचा शिडकावा पाहायला मिळाला.या पावसासोबत वादळी वारेदेखील वाहत असल्याने काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, या वादळी पावसाचा जाेर काही मिनीटातच आटोपला. ज्याठिकाणी ढग आले होते. तेथे हा पाऊस पडला. मात्र, तो संततधार बरसला नाही. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

भातकापणीचा हंगाम अंतिम टप्प्यातसध्या भातकापणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. ऑक्टोबर महिन्यात पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे भातकापणीचा हंगाम लांबला आहे. पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची झोपच उडाली होती. बुधवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाला होता. उष्णतेचे प्रमाण अचानक वाढले होते. तर गुरूवारी सकाळपासूनच थंडी गायब झाली होती आणि ढगाळ वातावरण होते.

आता पाऊस थांबून कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षायावर्षी पावसाळा सहा महिन्यांचा झाला आहे. त्यामुळे आता पाऊस थांबून कडाक्याची थंडी पडणे आवश्यक आहे. जर थंडी पडली तरच झाडांना मोहोर येऊन पुढे फळधारणा होणार आहे. त्यामुळे आंबा, काजू व इतर बागायतदारांना आता कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस