शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने कोट्यवधीची हानी पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू : वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: May 9, 2014 00:17 IST

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची त्रेधा उडविली. वेंगुर्ले वगळता इतर सर्व तालुक्यांत वादळी

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची त्रेधा उडविली. वेंगुर्ले वगळता इतर सर्व तालुक्यांत वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस पडला. कणकवली तालुक्यात सर्वाधिक ५१ मि. मी. तर त्या पाठोपाठ सावंतवाडी तालुक्यात ३५ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली असून, या पावसामुळे जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात पोहोचला आहे. पंचनामे सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कोकणात मान्सून सुरू होण्यास अद्याप एक महिना बाकी असतानाच बुधवारी जिल्ह्यात वेंगुर्ला वगळता वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसाने जिल्हावासीयांची त्रेधातिरपीट उडविली. सोसाट्याच्या झालेल्या वार्‍यात कित्येक जणांच्या घरांवरील सिमेंटचे पत्रे उडून गेले. शेकडो झाडे उन्मळून पडून वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच काही झाडे घरांवर, गुरांच्या गोठ्यांवर पडून लाखो रुपयांची हानी झाली आहे. कणकवली, सावंतवाडी व वैभववाडी तालुक्यात जोरदार वादळी पाऊस झाल्याने वीजवाहक तारांवर झाडे पडून तसेच विद्युत खांब उन्मळून पडल्याने काही ठिकाणचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता. या सर्व घटनेचा अद्याप नुकसानीबाबत रितसर पंचनामा झाला नसून, त्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे अद्याप नुकसानीची निश्चित आकडेवारी आपत्ती कक्षाकडे उपलब्ध नाही. (प्रतिनिधी)