Sindhudurg: अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त; कर्ली खाडी किनारी, तळगाव, आंबेरी परिसरात कारवाई
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 22, 2024 18:28 IST2024-05-22T18:28:29+5:302024-05-22T18:28:56+5:30
संदीप बोडवे मालवण : कर्ली खाडी किनारी तळगाव परिसरातील पेडवे, खांद, म्हावळुंगे तसेच आंबेरी डिचोलकरवाडी, मळावाडी येथे अनधिकृत वाळू ...

Sindhudurg: अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त; कर्ली खाडी किनारी, तळगाव, आंबेरी परिसरात कारवाई
संदीप बोडवे
मालवण : कर्ली खाडी किनारी तळगाव परिसरातील पेडवे, खांद, म्हावळुंगे तसेच आंबेरी डिचोलकरवाडी, मळावाडी येथे अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले एकूण २६ वाळू रॅम्प मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्या नेतृत्वाखालील महसूल पथकाने जमीनदोस्त केले आहेत.
तहसीलदार वर्षा झालटे, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांसह महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल पथकाच्या पाहणी दरम्यान काळेथर येथे सुमारे दहा ब्रास अनधिकृत वाळू साठा सापडून आला. हा वाळू साठा सील करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे मालवण महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.