कणकवलीत मधु दंडवते यांच्या आठवणींना उजाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 15:03 IST2020-11-12T14:59:25+5:302020-11-12T15:03:48+5:30
konkanrailway, madhudandwate, kankavli, sindhudurg कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी केंद्रीय मंत्री प्रा. मधु दंडवते यांनी कोकण विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचा आदर्श तरुणपिढीने समोर ठेवावा. त्यांच्यासारखे अजातशत्रू व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. अशा शब्दात आदरांजली वाहतानाच प्रा. मधु दंडवते यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

कणकवली रेल्वेस्थानकात गुरुवारी प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.
कणकवली : कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी केंद्रीय मंत्री प्रा. मधु दंडवते यांनी कोकण विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचा आदर्श तरुणपिढीने समोर ठेवावा. त्यांच्यासारखे अजातशत्रू व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. अशा शब्दात आदरांजली वाहतानाच प्रा. मधु दंडवते यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन व 'आम्ही कणकवलीकर' परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांच्या १५ व्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली रेल्वे स्थानकात गुरुवारी आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. मधु दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मधु दंडवते यांच्या सोबतच्या विविध आठवणींना उजाळा दिला.
यावेळी कृष्णकुमार शेठ,जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर,सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर,भाऊ चिरेकर, प्रसाद वालावलकर, प्रशांत तांबे, संजय खरीवले व अन्य कोकण रेल्वे कर्मचारी , नागरिक उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून अगदी साधेपणाने हा कार्यक्रम करण्यात आला.