शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ही तर विनायक राऊत यांच्या निरोपाची सभा, नितेश राणे यांचे टीकास्त्र 

By सुधीर राणे | Updated: February 5, 2024 18:54 IST

कणकवली: कणकवली विधानसभा मतदारसंघात आम्ही अनेक विकास कामे केली आहेत. त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास असून आमच्याशी लढा द्यायला विरोधकांकडे ...

कणकवली: कणकवली विधानसभा मतदारसंघात आम्ही अनेक विकास कामे केली आहेत. त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास असून आमच्याशी लढा द्यायला विरोधकांकडे उमेदवार नाही. त्यामुळे आम्हाला रोखू शकत नसल्याने  कणकवलीत सभा घेत शिव्या घालण्याचे काम काही लोकांकडून झाले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात खासदार झालेल्या विनायक राऊत यांनी गेल्या १० वर्षात काय केले? हे त्यांना सभेत सांगता आले नाही. त्यामुळे भाजपा आणि राणे कुटुंबियांवर विरोधकांनी फक्त टीका केली. कालची ठाकरे सेनेची सभा म्हणजे खासदार विनायक राऊत यांच्या निरोपाची सभा झाली असल्याची टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली.तसेच एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे भाजपा सोबत विनाअट युती करण्यासाठी प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी द्यायचा अशी सध्याची स्थिती आहे.असा गौप्यस्फोट ही त्यांनी यावेळी केला. कणकवली येथे आज, सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राणे म्हणाले, ठाकरे सेनेची रविवारी सभा झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला नाहक त्रास झाला. मला अनेक लोकांचे फोन आले. ते म्हणाले ज्यांनी ज्यांनी तुमच्यावर टीका केली, त्यांना आम्ही मतदानातून उत्तर देणार आहोत. महायुतीच्या माध्यमातून गावागावात विकासकामांची भूमिपूजने केली आहेत. त्यामुळे मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे. विकास करण्यासाठी माझ्या मतदारांनी मला निवडून दिले आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने  वातावरण खराब करायचे नाही, असे आम्ही ठरवले आहे.उद्धव ठाकरे मोठे गद्दार उद्धव ठाकरे हे किती मोठे गद्दार आहेत, हे राज्याने पाहिले होते. मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपा सोबत युती असताना कणकवलीत माझ्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार उभा केला. स्वतः जाहीर सभा घेतली. तरीही २०१९ मध्ये मोठ्या मताधिक्याने मी विजयी झालो. ग्रामपंचायत निवडणुकीत ८० टक्के पेक्षा जास्त सरपंच भाजपाच्या विचारांचे निवडून आले आहेत. काही त्यांचे आले तेही आमच्याकडे प्रवेशासाठी वेटींगवर आहेत. तसेच काल जे व्यासपीठावर होते, त्यांचेही मत लवकरच बदलेल. माझे आणि जनतेचे अतुट नाते आहे. जो कोण विरोधी उमेदवार उभा राहील त्याच्या विरोधात मी लढणार आहे. कालच्या सभेत जिल्हाभरातून तसेच राजापूरमधून लोक आणले. कोकणात बाळासाहेब ठाकरे यांची लाखोंची सभा होत होती. आता उद्धव ठाकरे कॉर्नर सभा घेत फिरत असल्याची टीका नितेश राणे यांनी केली.राणे संपले म्हणाचं, पण..विनायक राऊत यांची शेवटची निवडणूक आहे. आम्हाला कोणावरही टीका करायची नाही. आता माझ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आलेले आहेत. त्यामुळे मतदारसंघात विकासाच्या मुद्यावर आम्ही बोलू. एका बाजूला बोलायचे राणे संपले, मग बांदा ते खारेपाटण पर्यंत राणेंचे नाव घेतल्याशिवाय तुमची एकही सभा का होत नाही ? याचे उत्तर ठाकरे सेनेच्या लोकांनी द्यावे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेVinayak Rautविनायक राऊत