शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेचा सारीपाट: ठाकरेंना ठाकरेंकडूनच प्रत्युत्तर!

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 3, 2024 13:12 IST

महेश सरनाईक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे घराण्याचा ब्रँड देशपातळीवर कायमच झळकवत ठेवला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर अजूनही ...

महेश सरनाईकशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे घराण्याचा ब्रँड देशपातळीवर कायमच झळकवत ठेवला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर अजूनही त्यांच्या नावाचे वलय कायम आहे. बाळासाहेब हे आमचे दैवत होते, आज आहेत आणि भविष्यातही राहतील. असे सांगणारे हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते जे आज उद्धव ठाकरेंसमवेत नसतील पण ते जेथे कुठे असतील तेथे त्यांच्या तोंडून हीच वाक्ये कायम ऐकायला मिळतील. ठाकरे नावाची जादू गेली दशकानुदशके महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत ठाकरे नाव आपल्यासमवेत असावे म्हणून भाजपाने राज ठाकरेंना गळी पाडल्याचे मत राजकीय विश्लेषकांमधून व्यक्त होत आहे.सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. राज्यातील मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात निवडणूक होणार आहे. भाजपाकडून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे हे लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरले आहेत. उद्धवसेनेचे सचिव, विद्यमान खासदार विनायक राऊत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा नशीब आजमावणार आहेत.

महायुतीकडून राणेंच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजापुरात सभा झाली, तर उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत सभा झाला. आता उद्या ३ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रत्नागिरीत, तर उद्धव ठाकरे यांची कणकवलीत सभा होणार आहे. कणकवलीत ज्या उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. त्याच मैदानावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नारायण राणे यांच्या प्रचारार्थ ४ मे रोजी सभा होणार असून, ही प्रचाराच्या समारोपाची सभा असणार आहे. हा निवडणुकीचा सामना राऊत आणि राणे यांच्यात असला तरी राणे आणि ठाकरे घराण्यातील वादाची किनार त्याला लाभल्याने ठाकरे विरूद्ध राणे यांच्या राजकीय लढाईचा पुढील अंक म्हणून पाहिला जात आहे.

कणकवलीत उद्धव ठाकरे हे जे काही बोलणार, त्यांना त्यांच्याच ठाकरे शैलीत उत्तर देण्यासाठी राज्यातील राजकीय सभांव्दारे व्यासपीठ गाजविणाऱ्या राज ठाकरे यांना राणे आणि पर्यायाने भाजपाने मैदानात उतरविले आहे. गुढीपाडवा मिळाव्यात केवळ नरेंद्र मोदींसाठी मनसेने महायुतीला राजकीय पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांची ही कोकणातील आणि राज्यातील पहिलीच जाहीर प्रचारसभा असल्याने ठाकरे काय बोलणार ? ते उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांचा कसा समाचार घेणार ? याकडे संपूर्ण कोकणासह राज्य आणि देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे