चौके (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. विशेषतः कुडाळ-नेरूर पार-मालवण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आमदारांनी आपला येण्या-जाण्याचा मार्ग बदलला आहे. ते कुडाळ येथून नेरूर पार मार्गे मालवणला न जाता महामार्गाने कसाल मार्गे मालवणला जात आहेत. त्याला निवडून दिलेली जनता मात्र खड्ड्यांमुळे त्रस्त होत आहे, अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी काळसे येथे रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत उद्धवसेनेने महायुती सरकारविरोधात केलेल्या जनआंदोलनात सत्ताधाऱ्यांवर केली.मंगळवारी (दि.४) उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काळसे होबळीचा माळ येथे महायुती सरकारविरोधात बैलगाडीतून जनआंदोलन छेडण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर जनआंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. या आंदोलनात मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ नगरसेवक मंदार शिरसाट, नितीन वाळके, अमरसेन सावंत, मालवण शहरप्रमुख बाबी जोगी यांचा समावेश होता.
Web Summary : Shiv Sena (UBT) protested Sindhudurg's potholed roads with a bullock cart agitation led by former MLA Vaibhav Naik. The protest targeted the Mahayuti government, highlighting the poor road conditions forcing officials to reroute. Authorities promised action, leading to temporary suspension of the agitation.
Web Summary : शिवसेना (UBT) ने पूर्व विधायक वैभव नाइक के नेतृत्व में सिंधुदुर्ग की गड्ढों वाली सड़कों के खिलाफ बैलगाड़ी आंदोलन किया। आंदोलन महायुति सरकार को लक्षित था, जिसमें खराब सड़क की स्थिति पर प्रकाश डाला गया, जिसके कारण अधिकारियों को मार्ग बदलने के लिए मजबूर होना पड़ा। अधिकारियों ने कार्रवाई का वादा किया, जिससे आंदोलन अस्थायी रूप से निलंबित हो गया।