शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सावडाव मारहाणप्रकरणी उद्धवसेना आक्रमक; कारवाई न झाल्यास.., कणकवली पोलिस अधिकाऱ्यांना दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:39 IST

आरोपींवर ३०७ कलम लावा!

कणकवली : सावडाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव सावंत व एका महिलेला सावडाव उपसरपंच दत्ताराम काटे यांच्यासह अन्य तिघांनी मारहाण केली. पाच दिवस उलटून गेले, तरीही पोलिसांनी एकाही आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या उद्धवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा कणकवलीपोलिस ठाण्यावर धडक दिली. तसेच पोलिस अधिकाऱ्यांना त्यांनी कारवाईबाबतच्या दिरंगाईबद्दल जाब विचारला.पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे सावडाव हाणामारी प्रकरणातील आरोपी मोकाट आहेत. या आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिस त्यांना अभय देत असल्याने सिंधुदुर्गची वाटचाल बीड जिल्ह्याप्रमाणे होत आहे, असा आरोप माजी आमदार वैभव नाईक, राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी यावेळी केला. तसेच येत्या दोन दिवसांत सावडाव प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्यास कणकवली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला जाणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.कणकवली पोलिस ठाण्यात यावेळी उपस्थित असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव आणि पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांना उद्धवसेना पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हा संघटक मधुरा पालव, माधवी दळवी, वैदेही गुडेकर, राजू राठोड, कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, तात्या निकम, धीरज मेस्त्री आदींसह सावडाव ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस यंत्रणेवर जोरदार टीका केली. पोलिसांच्या आशीर्वादामुळेच सावडाव घटनेतील सर्व आरोपी मोकाट आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाणप्रकरणी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे देशमुख यांचा नंतर खून झाला. त्याच धर्तीवर सावडाव प्रकरणात कणकवली पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत.पोलिसांच्या या भूमिकेमुळे सावडाव गावातील अनेकजण आपणास कधीही मारहाण होऊ शकते, प्रसंगी खूनदेखील होऊ शकतो, अशा भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यामुळे सावडाव मारहाणप्रकरणी आरोपींवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाइल आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर यांनी यावेळी दिला.आरोपींवर ३०७ कलम लावा!सावडाव मारहाणप्रकरणी आरोपींवर ३०७ कलम लावण्यात यावे. तसेच त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीPoliceपोलिसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना