शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

जानवली ग्रामस्थांचे बॉक्सवेलसाठी लाक्षणिक उपोषण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 16:16 IST

मुंबई - गोवा महामार्गावर जानवली-साकेडी तिठा येथे बॉक्सवेल व्हावा. अशी जानवली ग्रामस्थांची मागणी आहे. त्याअनुषगाने जानवली - साकेडी फाट्या जवळ अगोदर जाहीर केल्याप्रमाणे लाक्षणिक उपोषण मंगळवारी करण्यात आले.

ठळक मुद्देजानवली ग्रामस्थांचे बॉक्सवेलसाठी लाक्षणिक उपोषण !मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा; लोकप्रतिनिधींची भेट

कणकवली : मुंबई - गोवा महामार्गावर जानवली-साकेडी तिठा येथे बॉक्सवेल व्हावा. अशी जानवली ग्रामस्थांची मागणी आहे. त्याअनुषगाने जानवली - साकेडी फाट्या जवळ अगोदर जाहीर केल्याप्रमाणे लाक्षणिक उपोषण मंगळवारी करण्यात आले.साकेडी तिठा येथे बॉक्सवेल होण्यासाठी यापूर्वी जानवली ग्रामस्थांनी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. मात्र , आता मागणी मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे जानवली ग्रामस्थ शिवराम राणे, अमोल राणे, संतोष सावंत, दामोदर सावंत यांनी यावेळी सांगितले.या लाक्षणिक उपोषणाच्यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्रिया सावंत,सरपंच आर्या राणे,माजी पोलीस पाटील पांडुरंग राणे,बाळा राणे,भगवान दळवी,राजू शेटये,शैलेश भोगले,अँड . हर्षद गावडे,चंदू साटम,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी सावंत,प्रकाश राणे,रामदास विखाळे, विनायक राणे,सत्यवान राणे,प्रकाश राणे,संदीप सावंत,अशोक राणे, दीपक बुकम आदी जानवली ग्रामस्थ उपस्थित होते.

या उपोषणाबाबतचे निवेदन जानवली ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांसह राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे कि, मारुती मंदिर केंद्रशाळा ही रस्त्याच्या पलीकडे आहे.या शाळेत १०० पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. यातील सुमारे ६० विद्यार्थ्यांना शाळेत ये- जा करावी लागते . बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल मधील मुलेही याच मार्गाने जात असतात. तर स्मशान भूमी हि होडीचे साना येथे आहे.साकेडीला जाणाऱ्या एस.टी.च्या ८ फेऱ्या होत असतात.जिल्हा कृत्रीम रेतन केंद्र,पशु संवर्धन दवाखान्यात शेतकऱ्यांच्या जनावरांना ने आण करणे तसेच ग्रामपंचायत कार्यालय ,तलाठी कार्यालय,रेशनींग दुकान आहे.तसेच होडीचे साना येथे जानवली नदीवर फुटब्रिज होणार असून कणकवली शहराकडे जाण्यासाठीचा जवळचा मार्ग ठरणार आहे.जानवली गावचे ग्रामदैवत वार्षिक जत्रोत्सवाच्यावेळी होडीचा साना येथे असलेल्या ब्राम्हणदेव भेटीसाठी जात असतात. त्यावेळी देव जाण्यासाठीचा तेथून मार्ग असल्याने जानवली-साकेडी तिठा येथे बॉक्सवेल होणे महत्वाचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.उपोषणस्थळी लोकप्रतिनिधींची भेट !या उपोषणस्थळी आमदार नितेश राणे,माजी आमदार प्रमोद जठार तसेच शिवसेना नेते संदेश पारकर आदी लोकप्रतिनिधींनी भेट दिली.तसेच शासनस्तरावर पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग