शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जानवलीत कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू, अपघातानंतर कार चालक पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 12:35 IST

कणकवली: मुंबई गोवा महामार्गावर जानवली, परबवाडी येथील फाट्यावर गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सिल्वर रंगाच्या स्विफ्ट कारने दुचाकीला मागून जोरदार ...

कणकवली: मुंबई गोवा महामार्गावर जानवली, परबवाडी येथील फाट्यावर गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सिल्वर रंगाच्या स्विफ्ट कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात अंजली अमित साळवी ( ३६, रा. शिवाजीनगर, कणकवली) यांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला आहे.हा अपघात गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला.मुंबई गोवा महामार्गावर जानवली, परबवाडी येथे आपली बहिण नूतन दळवी यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी अंजली साळवी या दुचाकी घेवून गेल्या होत्या.  नूतन दळवी या दुचाकीवरुन खाली उतरल्यानंतर अचानक मागून आलेल्या भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक  दिली. अंजली साळवी यांना जवळजवळ वीस ते तीस फूट फरफटत घेऊन कारचालक कारसह पसार झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अंजली साळवी यांना त्यांचे भावोजी ऍड .संतोष दळवी यांनी तत्काळ आपल्या कारमधून कणकवली येथील एका खाजगी रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले.  मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.या अपघाताचे वृत्त समजतात सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील, पोलिस नाईक रुपेश गुरव,स्वप्निल जाधव,भूषण सुतार आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून अंजली साळवी यांचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला. या घटनेचे वृत्त समजताच कणकवली येथील खाजगी रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर,चेतन मुंज,चेतन अंधारी,बाळा पाटील,सिद्धेश बांदेकर,संकेत बांदेकर,भालचंद्र पाटील आदी नागरिक यावेळी उपस्थित होते. अंजली साळवी यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, भाऊ ,बहीण, आई असा परिवार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातDeathमृत्यू