सिंधुदुर्ग : शिवसेना महिला कलमठ विभागाच्यावतीने आयोजित महिला दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी महिलांनी कलमठ विभाग ते कणकवली शहर अशी दुचाकी सायकल रॅली काढली. या रॅलीचा शुभारंभ लाड यांच्या हस्ते पोलिस स्टेशन समोर करण्यात आला. मराठमोळी नऊवारी साडी परिधान करून भगवे झेंडे घेवून कलमठ विभागातील महिला सहभागी झाल्या होत्या.याप्रसंगी अर्चना धुमाळे, वैदही गूडेकर, शैलजा मूखरे, पूजा बेलवलकर, धनश्री मेस्त्री, सूप्रीया पाटील, तृप्ती वाळके, कला दिवटे, प्रतिक्षा साटम, तेजल लिंग्रज, ममता सावंत, संजिवनी कोलते, सूप्रिया जाधव, भारती राठोड, स्वरा कांबळी, सायली धुत्रे, मेस्त्री आदी महिला उपस्थित होते.या रॅलीचे प्रमुख आकर्षण होते ते नऊवारी साडी आणि डोक्यावर भगवा फेटा यामुळे काही काळ कलमठ विभाग भगवामय झाला होता. यामध्ये शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. ही रॅली पोलीस स्टेशन येथून कलमठ बाजारपेठ मार्गे कुंभारवाडी ते बाजपेठ मार्गे पटवर्धन चौक कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यलयात या रॅलीची सांगता झाली.सायंकाळी महिलांसाठी फनिगेम घेण्यात आले. यामध्ये संगीत खुर्ची, बकेट मध्ये चेंडू टाकणे, चमच्यावर चेंडू ठेवून तोंडात धरून चालणे असे आदी फनिगेम पार पडले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू राठोड, विलास गुडेकर, अनुप वारंग, रिमेश चव्हाण आदींनी मेहनत घेतली.
मराठमोळी नऊवारी परिधान करून महिलांची कलमठमध्ये दुचाकी रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 13:32 IST
शिवसेना महिला कलमठ विभागाच्यावतीने आयोजित महिला दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी महिलांनी कलमठ विभाग ते कणकवली शहर अशी दुचाकी सायकल रॅली काढली. या रॅलीचा शुभारंभ लाड यांच्या हस्ते पोलिस स्टेशन समोर करण्यात आला. मराठमोळी नऊवारी साडी परिधान करून भगवे झेंडे घेवून कलमठ विभागातील महिला सहभागी झाल्या होत्या.
मराठमोळी नऊवारी परिधान करून महिलांची कलमठमध्ये दुचाकी रॅली
ठळक मुद्देमहिलांची कलमठमध्ये दुचाकी रॅलीमराठमोळी नऊवारी आणि डोक्यावर भगवा फेटामुळे भाग भगवामय