मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार

By Admin | Updated: April 9, 2017 16:59 IST2017-04-09T16:59:14+5:302017-04-09T16:59:14+5:30

अज्ञात वाहनाची धडक, वेताळबांबर्डे येथे अपघात

Two-wheeler killed in an accident on Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार

आॅनलाईन लोकमत

कुडाळ, दि. ९ : मुंबई-गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे येथे झालेल्या अपघातात लांजा येथील दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात सकाळी ७.३0 वाजता झाला. वेंगुर्ले कस्टम पोलिस कर्मचारी संतोष रामचंद्र लाखण असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

लाखण हे एमएच 0७ झेड ४२९५ या क्रमांकाच्या दुचाकीने सकाळी कुडाळ ते लांजा असा प्रवास करत होते. मुंबई-गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला ठोकरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Two-wheeler killed in an accident on Mumbai-Goa highway