शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: विनापरवाना रायफल, काडतुसांसह फिरणारे पन्हाळ्यातील दोघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 11:57 IST

रायफल, जिवंत काडतुसे, मॅग्झिन, दुचाकी केली जप्त

वैभववाडी : विनापरवाना बंदूक आणि जिवंत काडतुसे घेऊन दुचाकीवरून फिरणाऱ्या सागर दगडू नाईक (४५) आणि अभय रणजित पाटील (३०, दोघेही रा. यवलुज, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर) यांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार १ मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हेत थड्याची मळी येथे करण्यात आली. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.वैभववाडी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलिस हवालदार एस.डी. कांबळे, कर्मचारी डी.सी. कानसे, जितेंद्र कोलते हे दुपारी भुईबावडा ते नेर्ले मार्गावर गस्तीवर होते. भुईबावड्यापासून काही अतंरावर त्यांना दोन युवक दुचाकीवर संशयास्पद दिसून आले.परंतु, त्यांच्यापर्यंत पोलिस पोहोचण्याआधीच ते नेर्लेच्या दिशेने दुचाकीवरून पळून जाऊ लागले. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढल्याने त्या दोघांचा पाठलाग करून त्यांना हेत येथील थडीची मळी येथे गाठले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे विनापरवाना एक रायफल आणि जिवंत काडतुसे आढळून आली.याप्रकरणी सागर नाईक आणि अभय पाटील यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ७५ हजार रुपयांची रायफल, तीन हजार रुपयांची जिवंत काडतुसे, १० हजार रुपयांची मॅग्झिन आणि ४० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणाचा तपास तपास सहायक पोलिस निरीक्षक अवसरमोल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी